

पिंपरी, ता. २८ : ‘जागतिक क्रीडा स्पर्धेत टिकायचे असेल, तर आपल्या मानसिकता तसेच तंत्रात आमूलाग्र बदल करणे काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन बजाज ऑटो लिमिटेडचे माजी क्रीडा अधिकारी वसंत ठोंबरे यांनी केले.
पिंपळे गुरव येथील भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानच्या वतीने ‘जागतिक क्रीडा स्पर्धा आणि आजचा भारत’ विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यावेळी अध्यक्षीय मनोगतात ठोंबरे बोलत होते. यावेळी क्रीडा समालोचक पंकज पाटील, विश्वास सोहनी, महेश बोरोले, अरुण पवार, प्रकाश घोरपडे, सुरेश कंक उपस्थित होते.
सोहनी म्हणाले, ‘चीन, जपान या देशांत मुलांना लहानपणीच पोहणे शिकविले जाते. जागतिक स्पर्धेसाठी प्रशिक्षण देऊन तयार केले जाते. अशी जिद्द, चिकाटी, योग्य दिशा, मार्गदर्शन मुलांनी बालपणापासून घेतले तर आपल्या देशातही असे खेळाडू निर्माण होतील. आपल्याकडे थोडे आहे;अजून थोडी मेहनत घेतली तर उद्या निश्चितपणे बदल घडतील.’
महेश बोरोले यांनी प्रास्ताविक केले. संजय चव्हाण यांनी आभार मानले. लक्ष्मण शिंदे, विकास कोरे, पांडुरंग दोडके, बाळासाहेब साळुंखे, वैशाली चौधरी, मुरलीधर दळवी, संजय भंगाळे, रवींद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.