

पिंपरी, ता. २८ : शहरातील शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी (नो युवर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना परिमंडळ अधिकारी विजयकुमार क्षीरसागर यांनी दिल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने ३१ मार्च ही अंतिम मुदत दिली आहे.
चिंचवड शिधापत्रिका कार्यालयासह पिंपरी आणि भोसरी कार्यालयांतर्गतही या सूचना संबंधितांनी दिल्या आहेत. ‘केवायसी’ अपूर्ण असलेल्या शिधापत्रिकाधारकांची यादी दुकानदारांना पोचविण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात २४८ स्वस्त धान्य वितरण दुकानांतर्गत साडेतीन लाख शिधापत्रिकाधारकांचा समावेश होतो. राज्यातील सर्व ग्राहकांच्या रेशन कार्डला आधार क्रमांक जोडण्यात आले आहेत. तरीदेखील वितरणात दोन ते चार टक्क्यांची गळती दिसल्याने हे प्रमाण १०० टक्के करण्यासाठी राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ‘ई-केवायसी’ बंधनकारक केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात निगडी, भोसरी आणि पिंपरी असे तीन कार्यालयांतर्गत येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांकडून ही प्रक्रिया सुरू आहे.
शहरातील बुहतांश शिधापत्रिकधारकांची ‘केवायसी’ प्रक्रिया बाकी आहे. ही मुदत दोन दिवसांवर आली, तरी अद्याप काहींनी ‘केवायसी’ केली नाही. त्या बाबत परिमंडळ अधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानादारांची नुकतीच बैठकी बोलावली होती. त्यावेळी विविध सूचना देण्यात आल्या.
कोट :
अनेक शिधापत्रिकाधारक ‘केवायसी’कडे दुर्लक्ष करत आहेत. त्याबाबत आम्ही नुकतीच धान्य दुकानदारांची बैठक घेतली होती. त्यामध्ये शिधापत्रिकाधारकांची यादी दिली होती. किती जणांचे अपूर्ण आहे ते सांगितले आहे. त्यांचे ‘केवायसी’ पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.
- विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय, चिंचवड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.