

पिंपरी, ता. २८ : पवना नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी चिखली, बोपखेल आणि पिंपळे निलख येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची (एसटीपी) चाचणी (ट्रायल रन) घेण्यात येणार आहे. उर्वरित १०५ एमएलडीचे एसटीपी प्रकल्प विविध ठिकाणी उभारण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शुक्रवारी (ता.२८) देण्यात आली.
पवना नदीजवळील सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्पांची उभारणी करण्याबाबत राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडून आढावा घेण्यात आला. पर्यावरण विभागाच्या सचिवांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक झाली. त्या बैठकीत वरील माहिती देण्यात आली.
सध्या पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात आहे. परिणामी, पिंपरी चिंचवड शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत ‘सकाळ’ मध्ये ‘पवनेला फास’ ही वृत्तमालिका सविस्तर प्रसिद्ध करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाला देखील जाग आली आहे. त्यादृष्टीने झालेल्या या बैठकीत पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सहभागी झाले. त्यांच्याकडून सद्यस्थिती, चालू आणि नियोजित प्रकल्पांची माहिती देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून सध्या तीन ठिकाणी एसटीपी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्याची चाचणी (ट्रायल रन) घेण्यात येणार आहे. उर्वरित १०५ एमएलडीचे एसटीपी प्रकल्प ताथवडे, मामुर्डी, किवळे आदींसह विविध ठिकाणी उभारले जाणार आहेत. त्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात बैठकीत देण्यात आली; तर पीएमआरडीच्यावतीने १५ एसटीपी प्रकल्प उभारले जाणार आहेत. राज्य शासनाकडे त्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र अद्याप त्या प्रस्तावावर सकारात्मक मार्ग निघालेला नाही.
राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या सचिवांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये एसटीपी प्रकल्पाबाबत आढावा घेण्यात आला. महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती देण्यात आली.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.