

पिंपरी, ता. २८ : देशातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीच्या नामांकित कायनेटिक ग्रीन कंपनीने ई - लुनासाठी विशेष विश्वसनीय ‘बाय बॅक ऑफर’ची घोषणा केली आहे. खास गुढीपाडव्यापर्यंत ही ऑफर लागू आहे. या कालावधीत खरेदी केलेल्या सर्व ई - लुना वाहनांसाठी ३६ हजार रुपयांचे ‘बाय बॅक’ निश्चित केले आहे. तीन वर्षांसाठी वाहन मालकी हक्क पूर्ण केल्यानंतर ‘बाय बॅक’चा लाभ घेता येईल, असे कंपनीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
कंपनीकडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, या योजने अंतर्गत देशात पहिल्यांदा कायनेटिक कंपनीने अमर्यादित किलोमीटर कव्हरेजचा समावेश केला आहे. ‘फिरसे चल मेरी ई - लुना’ अशा कॅप्शनसह कंपनीने लोकांच्या सर्वाधिक पसंतीस ठरलेल्या पेट्रोलवरील लुनाचे ई - बाईकमध्ये हे मॉडेल मागील वर्षी मार्केटमध्ये आणले आहे. पिंपरी चिंचवड औद्योगिक शहरात लघुउद्योगांच्या मालवाहतुकीसाठी आरामात धावेल, अशी ई -लुनाची रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये दहा रुपयांत ११० किलोमीटर जाण्याची क्षमता आहे. १६ इंची टायर, पूर्णपणे मेटल बॉडी, १५० किलो भार वहन क्षमता, मोठी जागा, डिटेचेबल सीट आदी वैशिष्ट्ये आहेत. त्याचसोबत ३१ मार्चपर्यंत गुढीपाडव्यासाठी दहा हजार रुपये आणि केंद्र सरकारची दहा हजार रुपयांचे अनुदान या वाहनाला मिळणार आहे.
गुढी पाडव्याचा शुभमुहूर्त साधून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीने केले आहे.
जय माता दी ग्रीनचे मालक मनीष मोहिते म्हणाले,‘‘ई- लुनाखेरीज दुचाकींमध्ये ई - झुलू, झिंग तसेच तीन चाकींमध्ये ‘सफर शक्ती’ ही वाहने देखील मोहननगर, चिंचवड येथील शोरुमध्ये उपलब्ध आहेत. मागील सात वर्षांपासून ईव्ही क्षेत्रात कार्यरत असून विक्री आणि सुविधांसाठी हा नामांकित ग्रुप आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.