‘स्कॉफ’मुळे शिक्षकांची दमछाक

‘स्कॉफ’मुळे शिक्षकांची दमछाक
Published on

पिंपरी, ता. ३० : महाविद्यालयांच्या ‘नॅक’ मूल्यांकनाप्रमाणे आता राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (स्कॉफ) उपक्रम सुरू केला. या उपक्रमात १२७ मुद्द्यांवर ऑनलाइन माहिती भरण्यासाठी परीक्षेच्या काळातच वाढीव कामामुळे शिक्षकांची दमछाक होत आहे. दुसरीकडे पदरमोड करून शिक्षक अहवाल तयार करत असल्याने भुर्दंड सहन करावा लागत असल्याची तक्रार शिक्षक मांडत आहेत.
‘एससीईआरटी’ने राज्य मंडळाच्या सर्व शाळांना शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (स्‍कॉफ) २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. शहरातील सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना ऑनलाइन मूल्यांकनाची लिंक दिलेली आहे. या आराखड्यात शाळांनी स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित आहे. पण शाळेतील शैक्षणिक उपक्रम, वार्षिक नियोजन, पालक सभा, क्रीडा शिक्षण, अध्ययन निष्पत्ती, वृक्षारोपण व पर्यावरणपूरक उपक्रम, ई-लर्निंगचा वापर, अशा विविध प्रशिक्षणाशिवाय माहिती ऑनलाइन भरणे अशक्य आहे. नुकत्याच दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या आणि सध्या पहिली ते नववीपर्यंतच्या वार्षिक परीक्षेची तयारी सुरू आहे. त्‍यामुळे वेळ कमी पडत असल्‍याचे शिक्षक संघटनेचे म्‍हणणे आहे. या विषयावर शिक्षकांमध्‍ये नाराजी आहे.

१२७ मुद्द्यांवरील माहिती
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून व (एमसीईआरटी) १२७ मुद्द्यांवरील माहिती शाळांकडून मागवण्‍यात आली आहे. चर्चासत्रे, इयत्तानिहाय झालेल्या पालक सभा, वार्षिक नियोजन, खेळातून शिक्षण, कथाकथन, अध्ययन निष्पत्तीवर आधारित उपक्रम, वृक्षारोपणासारखे उपक्रम, ई-लर्निंग साहित्याचा वापर आदींचा यात समावेश आहे.

परीक्षांच्या तोंडावर मूल्यांकनाची भर
‘‘ही माहिती भरण्याचे काम वेळखाऊ आहे. शालेय परीक्षांच्या तोंडावर पूर्ण करता येणे शक्य नाही. वार्षिक परीक्षा आल्या, की कुठली ना कुठली कामे काढून शिक्षकांच्या माथी मारण्याचा शिरस्ता शिक्षण विभागाने यंदाही पाळला आहे. यंदा शिक्षकांवर बोर्डाच्या परीक्षा, क्षमतावृद्धी प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांना शिकविणे, असे तिहेरी ओझे असतानाच त्यात या मूल्यांकनाची भर पडली आहे,’’ अशी तक्रार शिक्षक मांडत आहेत.

‘स्कॉफ’ उपक्रमात विविध १२७ मानके असलेल्या आराखड्याची माहिती देताना शिक्षक त्रस्त झाले आहेत. यामुळे परीक्षा घ्यायची की, हे काम करायचे? ही सर्व माहिती भरण्यास दोन महिन्यांचा वेळही कमी पडणार आहे.
- एक शिक्षक

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची तसेच त्यानुषंगाने तयार केलेल्या शालेय अभ्यासक्रम आराखडा शिक्षकांना माहिती होण्यासाठी आहे. महाराष्ट्र शासनाचा हा अत्यंत महत्त्वकांक्षी उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध राबविला जात आहे. यातून शाळांनी स्वयंमूल्यमापन होणार आहे.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, मनपा शिक्षण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com