राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनाच ठप्प!

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनाच ठप्प!
Published on

पिंपरी, ता. ३० : केंद्र शासनाच्‍या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्‍या जनजागृतीबाबत पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयाची उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. सामान्य नागरिकांना या योजनेची फारशी माहिती नसल्याची स्थिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, गेल्‍या आर्थिक वर्षात शहरातून या योजनेअंतर्गत एकही अर्ज दाखल नसल्याची कबुली खुद्द अधिकारीच देत आहेत.

दारिद्ररेषेखालील कुटुंबातील कर्ता स्‍त्री अथवा पुरुष यांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाते. याचा लाभ मिळवण्यासाठी संबंधितांच्‍या कुटुंबीयांनी कर्त्या व्यक्तीच्या मृत्यू दिनांकापासून तीन वर्षांत अर्ज द्यायचा आहे. पूर्वी एक वर्षाची मुदत होती. मात्र, त्‍यामध्ये वाढ करण्यात आली आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज आल्‍यास ते मंजूर करू नयेत, असे आदेश शासनाचे आहेत. अर्जाची छाननी काटेकोरपणे करण्यासाठी अर्जदारांनाच या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळेल, याची दक्षता संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी यांनी घ्यायची आहे. पण, अपर तहसील कार्यालयाकडून या योजनेबाबत जनजागृती होताना दिसत नाही. शहराची लोकसंख्या २७ लाखांच्‍या पुढे गेली आहे. मात्र, गेल्या वर्षभरात एकाही कुटुंबाने या योजनेसाठी अर्ज केला नसल्‍याची स्‍थिती आहे. संजय गांधी निराधार योजना विभागाकडून या योजनेसाठी अर्ज घेतले जात असल्‍याचे पिंपरी-चिंचवडचे अप्‍पर तहसीलदार सांगत आहेत.

अशी आहे योजना
- केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राबवली जाते.
- दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद आवश्‍यक.
- १८ ते ५९ वयोगटातील (६० वर्षापेक्षा कमी) कर्ता स्त्री/पुरुष मरण पावल्यास आर्थिक मदत.
- कुटुंबीयांना एकरकमी २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज घेतला जातो. प्राप्‍त अर्ज हवेली तहसीलकडे पाठविले जातात. त्‍यांच्‍याकडून मंजुरी मिळते.
- जयराज देशमुख, अपर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड.

पात्र कुटुंबाला राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. त्‍यासाठी अर्ज आल्‍यास आम्‍ही पडताळणी करून मंजुरी देत आहे. पिंपरी-चिंचवडमधून एकही अर्ज गेल्‍या आर्थिक वर्षात प्राप्‍त झालेला नाही.
- अमोल कदम, तहसीलदार, हवेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com