मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय

मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय
Published on

निगडी येथील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात ‘ग्लोबल मल्टीडिसिप्लिनरी हेल्थकेअर रिसर्चमध्ये ‘नवीन क्षितिज उलगडताना’ या विषयावर इंडो-यूएस आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. जागतिक आरोग्य समस्यांवर प्रभावी उपाय शोधू शकते, यावर भर देण्यात आला. ‘ॲपएमकॉप’च्या सहकार्याने इंडो-यूएस आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत डॉ. श्यामकांत शिंपी (सिनिअर वाइस प्रेसीडेंट, आर अँड डी, सेंटॉर फार्मासुटिकल्स, पुणे), डॉ. गजानन एकबोटे (कार्याध्यक्ष, बिसनेस कौन्सिल, प्रोग्रेसिव एक्युकेशन सोसायटी) उपस्थित होते. डॉ. जावेद अली आणि डॉ. विजय मसंद यांनी स्तनाचा कर्करोग उपचारासाठी औषध वितरणाचे धोरणात्मक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाचा औषध रचना आणि वितरणामधील उपयोग यावर मार्गदर्शन केले. मॉडर्न फार्मा म्युझिक क्लबतर्फे डॉ. निकिता गायकवाड, डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. दुसऱ्या दिवशी डॉ. राजीव दहिया यांच्या स्वागत भाषणानंतर डॉ. सोमनाथ सिंग यांनी आंतरशाखीय सहकार्याद्वारे ‘नावीन्यपूर्ण संशोधनाची संधी’ यावर विचार मांडले. डॉ. गौरव गुप्ता यांनी ‘स्मार्ट फार्मा: ए आय आणि नावीन्याचा संगम’ यावर व्याख्यान दिले. डॉ. वेट्रीसेल्वन सुब्रमणियन यांनी ‘आधुनिक औषध संशोधनातील संधी’ यावर विचार मांडले. डॉ. अरविंद घोष यांनी ‘आधुनिक औषध शोध प्रक्रियेतील इनसिलीको पद्धतींची भूमिका’ यावर प्रभावी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. पी. डी. चौधरी यांनी समारोपाचे भाषण केले. डॉ. महेश बुरांडे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. स्मिता पिंपळे यांनी आभार केले. प्रा. रुपाली जिंतूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

एआयसीटी डिझाईन अॅकॅडमी
जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत एआयसीटी डिझाईन अॅकॅडमीची विद्यार्थिनी तनिशा हाडोळे हिने जेईई मेन बी.आर्च परीक्षेत ९९.९५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. तिच्या या यशाबद्दल एआयसीटीचे संचालक राजेश सप्रा, संचालिका लीना सप्रा, आर्किटेक्ट अपर्णा शिंदे, शिवानी सुर्वे, रवी द्विवेदी यांनी अभिनंदन केले.

महात्मा फुले महाविद्यालय
महात्मा फुले महाविद्यालयात रयतमाऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ९५व्या स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले, ‘‘रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत लक्ष्मीबाई पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे. रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेमागील अण्णांची खरी प्रेरणा ही त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील याच होत्या, असे मत व्यक्त करत त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. कामायनी सुर्वे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय महिला मंचच्या प्रमुख प्रा. स्वप्ना हजारे यांनी करून दिला. प्रा. संग्राम गोसावी यांनी आभार मानले. डॉ. तृप्ती अंब्रे आणि डॉ. विजया पोकळे यांनी सूत्रसंचालन केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या हॅकेमिट २०२५ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या एअरोस्पेस, रोबोटिक्स, ऑटोमोटिव्ह आणि सस्टेनेबिलिटी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संकल्पनांचे भव्य सादरीकरण केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी क्लबच्या नेतृत्वाखालील पदयात्रेने झाली. त्यानंतर पॅव्हिलियनचे औपचारिक उद्‍घाटन करण्यात आले. मान्यवरांनी प्रदर्शनातील स्टॉलना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या नवकल्पनांची माहिती घेतली. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड. यांनी प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय
रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी विद्युत वितरणचे माजी मुख्य अभियंता प्रल्हाद साळुंखे म्हणाले, ‘‘‘मोठी स्वप्ने पाहा, नव्या संधी शोधा, आणि संपूर्ण जगाला दाखवून द्या की, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट फक्त कागदाचा तुकडा नाही, तर यशाची सुरुवात आहे. रोटरी क्लब ऑफ औंधचे अध्यक्ष राजेंद्र शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, डॉ.
तानाजी हातेकर, माजी उपप्राचार्य रमेश रणदिवे, प्रा. सविता पाटील, प्रा. कल्पना कांबळे, प्रा. स्वाती चव्हाण, विद्यार्थी परिषद अध्यक्ष साक्षी खवळे, दीपाली पुजारी आदी उपस्थित होते. समारंभात शैक्षणिक पारितोषिक वाचन प्रा. सुशील गुजर यांनी केले तर सांस्कृतिक पारितोषिक वाचन डॉ. रेश्मा दिवेकर यांनी केले. क्रीडा पारितोषिक वाचन प्रा. सौरभ कदम यांनी केले. प्रा. सायली गोसावी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार उपप्राचार्य प्रभंजन चव्हाण यांनी मानले.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. माजी विद्यार्थ्यांचे अनुभवाचा सध्या संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, या उद्देशाने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रास्ताविक करताना संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले. यशस्वी संस्थेच्या आयआयएमएसने मलेशियातील एमएएचएसए युनिव्हर्सिटी, नेपाळमधील युनिग्लोबल महाविद्यालय आणि इंडो युरोपियन एज्युकेशन फाउंडेशनसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत केलेल्या सामंजस्य करारांची यावेळी माहिती दिली. तसेच औद्योगिक भेटी, सीएसआर उपक्रमातील विद्यार्थी सहभाग, अतिथी प्राध्यापकांची व्याख्याने आदींबाबतची माहिती दिली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. सपना भंडारी आणि पूजा मासाळ या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. अनुज कुशवाह, प्रणीत जगताप, राणी वानखडे आणि सेजल गायकवाड यांनी मेळाव्यासाठी सहकार्य केले. तर, डॉ. पुष्पराज वाघ यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण व आभारप्रदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com