

कॉलेज कट्टा
---
इंडो-यूएस आंतरराष्ट्रीय परिषद
(मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी)
निगडीतील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ग्लोबल मल्टीडिसिप्लिनरी हेल्थकेअर रिसर्चमध्ये ‘नवीन क्षितिज उलगडताना’ विषयावर इंडो-यूएस आंतरराष्ट्रीय परिषद झाली. जागतिक आरोग्य समस्यांवर प्रभावी उपाय शोधू शकते, यावर भर दिला. ‘ॲपएमकॉप’च्या सहकार्य लाभले. डॉ. श्यामकांत शिंपी (सिनिअर वाइस प्रेसीडेंट, आर अँड डी, सेंटॉर फार्मासुटिकल्स, पुणे), डॉ. गजानन एकबोटे (कार्याध्यक्ष, बिसनेस कौन्सिल, प्रोग्रेसिव एक्युकेशन सोसायटी) उपस्थित होते. डॉ. जावेद अली आणि डॉ. विजय मसंद यांनी ‘स्तनाचा कर्करोग उपचारासाठी औषध वितरणाचे धोरणात्मक दृष्टिकोन, तंत्रज्ञानाचा औषध रचना आणि वितरणामधील उपयोग’ यावर मार्गदर्शन केले. मॉडर्न फार्मा म्युझिक क्लबतर्फे डॉ. निकिता गायकवाड, डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. डॉ. राजीव दहिया यांनी स्वागत केले. डॉ. सोमनाथ सिंग (आंतरशाखीय सहकार्याद्वारे नावीन्यपूर्ण संशोधनाची संधी), डॉ. गौरव गुप्ता (स्मार्ट फार्मा ः एआय आणि नावीन्याचा संगम), डॉ. वेट्रीसेल्वन सुब्रमणियन (आधुनिक औषध संशोधनातील संधी), डॉ. अरविंद घोष (आधुनिक औषध शोध प्रक्रियेतील इनसिलीको पद्धतींची भूमिका), प्राचार्य डॉ. पी. डी. चौधरी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. महेश बुरांडे यांचा सत्कार केला. डॉ. स्मिता पिंपळे यांनी आभार केले. प्रा. रुपाली जिंतूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
लक्ष्मीबाईंच्या आठवणींना उजाळा
(महात्मा फुले महाविद्यालय)
महात्मा फुले महाविद्यालयात रयतमाऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ९५व्या स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले, ‘‘रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत लक्ष्मीबाई पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे. रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेमागील अण्णांची खरी प्रेरणा ही त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील याच होत्या.’’ प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. कामायनी सुर्वे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय महिला मंचच्या प्रमुख प्रा. स्वप्ना हजारे यांनी करून दिला. प्रा. संग्राम गोसावी यांनी आभार मानले. डॉ. तृप्ती अंब्रे आणि डॉ. विजया पोकळे यांनी सूत्रसंचालन केले.
नावीन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण
(एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी)
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या हॅकेमिट २०२५ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या एअरोस्पेस, रोबोटिक्स, ऑटोमोटिव्ह आणि सस्टेनेबिलिटी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण केले. विद्यार्थी क्लबने पदयात्रा काढली. पॅव्हिलियनचे औपचारिक उद्घाटन झाले. मान्यवरांनी प्रदर्शनातील स्टॉलना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून नवकल्पनांची माहिती घेतली. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी शुभेच्छा दिल्या.
वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय)
रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात झाले. महावितरणचे निवृत्त मुख्य अभियंता प्रल्हाद साळुंखे म्हणाले, ‘‘मोठी स्वप्ने पाहा, नव्या संधी शोधा, आणि संपूर्ण जगाला दाखवून द्या की, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट फक्त कागदाचा तुकडा नाही, तर यशाची सुरुवात आहे.’’ रोटरी क्लब ऑफ औंधचे अध्यक्ष राजेंद्र शेलार अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, डॉ. तानाजी हातेकर, माजी उपप्राचार्य रमेश रणदिवे, प्रा. सविता पाटील, प्रा. कल्पना कांबळे, प्रा. स्वाती चव्हाण, विद्यार्थी परिषद अध्यक्ष साक्षी खवळे, दीपाली पुजारी आदी उपस्थित होते. पारितोषिक वाचन प्रा. सुशील गुजर, डॉ. रेश्मा दिवेकर, प्रा. सौरभ कदम यांनी केले. प्रा. सायली गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य प्रभंजन चव्हाण यांनी आभार मानले.
माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
(इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट)
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात झाला. संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या आयआयएमएसने मलेशियातील एमएएचएसए युनिव्हर्सिटी, नेपाळमधील युनिग्लोबल महाविद्यालय आणि इंडो युरोपियन एज्युकेशन फाउंडेशन यांच्याशी झालेल्या सामंजस्य करारांची माहिती दिली. सपना भंडारी आणि पूजा मासाळ यांनी सूत्रसंचालन केले. अनुज कुशवाह, प्रणीत जगताप, राणी वानखडे आणि सेजल गायकवाड यांनी सहकार्य केले. डॉ. पुष्पराज वाघ यांनी आभार मानले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.