शिरखुर्मा साहित्याच्या खरेदीसाठी लगबग ईदची तयारी ः शेवया आणि ड्रायफ्रुटच्या दरात पंचवीस टक्क्यांनी वाढ
पिंपरी, ता. २९ ः शहरातील मुस्लिम बांधवांच्या घरी शिरखुर्म्याची लगबग सुरू झाली आहे. यासाठी आवश्यक असलेल्या शेवया आणि ड्रायफ्रुटच्या दरात वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ईदच्या दिवशी खास असलेला ‘शिरखुर्मा’ तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या ड्रायफ्रुटला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांकडून शहरातील बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. तसेच इतरही साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे.
पवित्र रमझान महिन्यात इफ्तारसाठी काही खास पदार्थांची मेजवानी असते. त्यामुळे मिठाई, ड्रायफ्रुट तसेच खमंग पदार्थांची अनेक दुकाने शहरात थाटली असल्याचे दिसून आले आहेत. मुस्लीम बांधवांकडून शिरखुर्मा, सुतारफेणी, मालपोवा, शाही तुकडा, तुर्री आणि कबाब या पदार्थांना रमझान महिन्यात जास्त मागणी आहे. जवळपास या सर्वच पदार्थांमध्ये शेवया वापरल्या जातात. शहरातील बाजारात ड्रायफ्रुटची मोठी रेलचेल चालू असल्याचे व्यापारी वर्गानी सांगितले. शहरातील विविध भागात सुकामेव्याचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉलवर मुस्लिम बांधवाकडून सुकामेवा मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. बाजारात रमझान ईदच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे ड्रायफ्रुटस दाखल झाले आहेत.
...
फेणी :
ईद सणात केला जाणारा सर्वात स्पेशल पदार्थ म्हणजे पांढऱ्या, पिवळ्या, केशरी आणि हिरव्या रंगातील बारीक शेवया घेण्यासाठी बाजारात लावलेल्या स्टॉलवर तुडूंब गर्दी होत आहे. फेणीमध्येही यंदा वेगळे प्रकार आले आहेत. यात बनारस अर्थात पातळ असलेली शेवई उपलब्ध आहे. तसेच भाजलेल्या तयार अशा खिमामी फेणीला चांगली मागणी आहे. शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या ड्रायफ्रुटचे साहित्य बाजारपेठेत रस्त्या-रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवले आहे.
...
शेवई
केसरी ः ३०० रुपये किलो
पांढरी ः २२० रुपये किलो
रोस्टेड ः १६० रुपये किलो.
...
ड्रायफ्रूटचे दर पुढीलप्रमाणे
ड्रायफ्रुटचा प्रकार किंमत प्रति किलो
बदाम ः ८६० रुपये
काजू ः ८८० रुपये
पिस्ता ः १६०० ते २४०० रुपये
सुके अंजीर ः १२०० रुपये
मनुका ः ४०० ते ४५० रुपये
अक्रोड ः ११०० ते १२०० रुपये
चारोळी ः २२०० रुपये
मगज बी ः ११५० ते १२०० रुपये
खारीक ः ४३० रुपये
...
पवित्र रमझान सणानिमित्त शेवया खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी.
--------------------
फोटोः 01946
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.