गतिरोधकांअभावी वाहने सुसाट

गतिरोधकांअभावी वाहने सुसाट
Published on

पिंपरी, ता. ३० : निगडी-प्राधिकरण येथील जलशुद्धीकरण केंद्रासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौक गतिरोधकांअभावी धोकादायक बनला आहे. त्यामुळे या ठिकाणी सतत किरकोळ अपघाताच्या घटना घडत असल्याने गंभीर अपघात घडण्याची शक्यता येथील स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी-प्राधिकरण हा उच्चभ्रू समजला जाणारा परिसर आहे. सायंकाळच्या वेळी ज्येष्ठ नागरिक लहान मुलांना घेऊन घराबाहेर पडतात. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आकुर्डी, निगडी, तळवडे, मुकाई चौक आणि देहू येथील नागरिकांसाठी सोईचा ठरत आहे. त्यामुळे येथून दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचीदेखील वाहतूक सुरू आहे. मात्र, या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले नसल्याने वाहनचालक आपली वाहने सुसाट चालवितात. परिणामी, भरधाव वाहनांमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. कित्येकवेळा किरकोळ अपघाताच्या घटनादेखील या ठिकाणी घडत आहेत. एखादा मोठा अपघात घडल्यावरच प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल येथील स्थानिक नागरिक करीत आहेत. गतिरोधक बसविल्यास वाहनांचा वेग कमी होईल. त्यामुळे अपघाताची संख्याही घटणार असल्याने या ठिकाणी त्वरित गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

‘‘येथील चौकामधून सतत वाहतूक सुरू असते. इतर वाहनांसह अवजड वाहनेही सुसाट धावत आहेत. किरकोळ अपघाताच्या घटना या ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी त्वरित गतिरोधक बसविण्यात यावे.
- शैलेश शिंदे, नागरिक

‘‘भक्ती-शक्ती ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात गतिरोधक बसविण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. काही दिवसांत चौकातील प्रत्येक मार्गात गतिरोधक बसविले जातील.
- बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com