उन्हामुळे कलिंगडाच्या मागणीत वाढ; किंमत दुप्पट

उन्हामुळे कलिंगडाच्या मागणीत वाढ; किंमत दुप्पट
Published on

सोमाटणे, ता. ३० ः मावळात तापमान वाढीमुळे कलिंगडाला मागणी वाढली असून, त्याची किंमत दुप्पट वाढली आहे. यावर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच वातावरणातील तापमान वाढीला सुरुवात झाली. मार्चमध्ये तापामानाचा पारा ३८ अंशाच्या पुढे गेला. तापमान वाढीमुळे उन्हाळ्यात पाणीदार फळ म्हणून कलिंगडाला मागणी वाढली आहे.
मावळात उन्हाळ्यात पर्यटकांची वर्दळ अधिक असते. त्यामुळे कलिंगडाला चांगली बाजारपेठ मिळेल हीच संधी शोधून दुसऱ्या जिल्ह्यातील कलिंगड विक्रेत्यांनी मावळात हजेरी लावली आहे. परभणी, अहिल्यानगर परिसरातील अनेक विक्रेत्यांनी मावळातील सोमाटणे, वडगाव, तळेगाव, लोणावळा आदी ठिकाणाला प्राधान्य देऊन रस्त्यालगत दुकाने थाटली आहेत. सध्या ग्राहक इतर फळांपेक्षा कलिंगडाला अधिक प्राधान्य देत आहेत. परिणामी, कलिंगड खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. हीच संधी शोधून विक्रेत्यांनी गेल्या आठ दिवसांपासून कलिंगडाच्या किमती दहा ते वीस रुपयांनी वाढवल्या आहेत. पूर्वी वीस रुपयांस मिळणाऱ्या लहान कलिंगडास आता किमान तीस ते चाळीस रुपये मोजावे लागत आहेत. कलिंगडाच्या किमती वाढल्या तरीही खरेदी कमी झालेली नाही.
सोमाटणे येथील विक्रेते सुरजकुमार म्हणाले, ‘‘दरवर्षीपेक्षा यावर्षी कलिंगडाला दुप्पट मागणी वाढली आहे. त्याचा पुरवठा करण्यासाठी तातडीने गावावरून कलिंगड मागवावे लागतात. त्यामुळे आमचा वाहतूक खर्च वाढल्याने आम्ही किमतीत वाढ केली आहे.

PNE25V02100

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com