

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक. नवचैतन्याचा सण. हा सण रविवारी (ता.३०) मोठ्या थाटामाटात आणि आनंदात सर्वत्र साजरा केला गेला. यमुनानगर येथे अनेक महिला व शालेय विद्यार्थी सकाळीच मिरवणुकीत पारंपरिक तसेच थोर संतांच्या वेशभूषेत दिसत होते. ज्येष्ठांपासून ते लहानांपर्यंत मुली हातात लेझीम घेऊन सहभागी झाल्या. अनेक तरुणी ढोल - ताशांच्या गजरात थिरकताना दिसत होत्या. टाळकरी लहान मुलांनी विविध खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली; तर केरळी वाद्यवृंदानी देखील मिरवणुकीत रंगत आणली. त्याचीच ही चित्रमय झलक. (रितेश छपरीबंद : सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.