गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त
Published on

मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा

पिंपरी : ‘खरेदीखत झाल्याशिवाय प्लॉटवर यायचे नाही’, असे म्हणत पाच जणांनी मिळून एकाला रॉड व दगडाने बेदम मारहाण केली. ही घटना हिंजवडीतील वाकड-हिंजवडी रस्त्यावर घडली. या प्रकरणी जयदीप आनंदराव ठाकर (रा. ठाकर वस्ती, माण) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोरख हुलावळे, विकी ववले, मच्छिंद्र हुलावळे (तिघेही रा. हुलावळे वस्ती, हिंजवडी) आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना ‘जागेचे पेपर दाखव तसेच खरेदीखत झाल्याशिवाय प्लॉटवर यायचे नाही’, असे म्हणत लोखंडी रॉड, दगड आणि हातांनी मारहाण केली. त्यामध्ये फिर्यादी जखमी झाले. फिर्यादी यांना शिवीगाळ करीत पाय तोडण्याची धमकी दिली.

अनैतिक संबंधातून एकावर वार
पिंपरी : पत्नीसोबत प्रेम संबंध ठेवल्याच्या कारणावरून एका तरुणावर धारदार हत्याराने वार करण्यात आले. ही घटना बावधन येथे घडली. या प्रकरणी बावधन मधील ३२ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार बावधन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. फिर्यादी हे बावधन येथील मराठा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ थांबले असताना आरोपी तिथे आला. ‘माझ्या पत्नीसमवेत प्रेम संबंध ठेवतो का, तुला आता सोडत नाही’, असे म्हणत आरोपीने फिर्यादीवर धारदार हत्याराने वार केला.


गॅस सिलिंडरचा काळा बाजार; एकावर गुन्हा
पिंपरी : बेकायदारित्या सिलिंडरमधून गॅस रिफिलिंग करून त्याची काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केली. याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई चऱ्होलीतील काळे कॉलनी येथे करण्यात आली. शशिकांत बालाजी मुळे (वय २४, रा. काटे कॉलनी, चऱ्होली) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी शशिकांत याने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून चार किलो वजनाच्या सिलिंडरमध्ये धोकादायकरीत्या गॅस काढला. चार किलो वजनाचे सिलिंडर त्याने काळ्या बाजारात चढ्या दराने विकले. या कारवाईमध्ये गॅस साठा आणि इतर साहित्य असा एकूण ४६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.


महिलेकडून पाच किलो गांजा जप्त
पिंपरी : गांजा विक्रीसाठी आलेल्या एका महिलेला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली. या महिलेकडून पाच किलो ८२४ ग्राम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई एमआयडीसी भोसरीतील सेक्टर नंबर १२ येथे करण्यात आली. तेथे एक महिला गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून दोन लाख ८२ हजार रुपये किंमतीचा पाच किलो ८२४ ग्रॅम किलो वजनाचा गांजा जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com