चिंचवडमध्ये टोळक्याचा राडा

चिंचवडमध्ये 
टोळक्याचा राडा
Published on

पिंपरी, ता. ३० : हातगाडी चालकांना शिवीगाळ करीत हातगाडीवर कोयता आणि लाकडी दांडक्याने मारून नुकसान केले. तसेच दमदाटी करीत एका तरुणावर कोयत्याने वार करून चार जणांच्या टोळक्याने राडा घातला. ही घटना चिंचवडमधील बिजलीनगर येथे घडली.
याप्रकरणी राहुल रामा राठोड (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ऋतिक पाथरे (वय २०, रा. बळवंतनगर, चिंचवड) व सौरभ डोलारे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) यांना अटक केली असून, शुभम शिंदे (वय २२), ऋतिक पाथरे (वय २०), हुसेन बागवान (वय २५, दोघेही रा. चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी राहुल हे रविराज वडेवाले या हातगाडीवर काम करत होते. आरोपी तिथे आले. त्यांनी विनाकारण राहुल आणि इतर हातगाडी चालकांना शिवीगाळ करून कोयता आणि दांडक्याने हातगाडीवर मारून नुकसान केले. दरम्यान, राहुल यांनी याबाबत जाब विचारला असता, आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. राहुल यांनी आरोपींचा वार चुकविला.
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com