छत्रपती संभाजीराजांचे चरित्र प्रेरणादायी मानसी बडवे यांचे प्रतिपादन; श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवात व्याख्यान

छत्रपती संभाजीराजांचे चरित्र प्रेरणादायी 
मानसी बडवे यांचे प्रतिपादन; श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवात व्याख्यान
Published on

पिंपरी, ता. ३० ः ‘‘छत्रपती संभाजीराजे यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. तर त्यापासून अनेक योद्धे अन् वीर यांनी प्रेरणा घेऊन स्वराज्याचे रक्षण केले,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार मानसी बडवे यांनी केले.
चिंचवडमधील श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळातर्फे बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगणात श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त आयोजित संगीत व्याख्यानात ‘स्वराज्यरक्षकाची गाथा’ विषयावर बडवे बोलत होत्या. मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे, हेमा दिवाकर, माधव कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र चिंचवडे आदी उपस्थित होते.
बडवे म्हणाल्या, ‘‘अवघे बत्तीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अन् त्यातही आठ वर्षे स्वराज्यरक्षणासाठी रणांगणावर लढलेल्या संभाजीराजे यांचा इतिहास युगानुयुगे मांडला तरी कमीच आहे. संघर्ष हा शंभुराजे यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग होता. देह संपला तरी चालेल, पण धर्मांतर करणार नाही, हा त्यांच्या वज्रनिश्चयाचा इतिहास नव्या पिढीसमोर आला पाहिजे.’’
जन्मापासून बलिदानापर्यंतचा शंभुराजे यांचा जाज्वल्य इतिहास मांडताना बडवे यांनी अनुरूप अशा पदांचे गायन केले. विशेषत: धर्मासाठी अनन्वित अत्याचार सहन करून त्यांनी जे बलिदान दिले त्याचे हृदयद्रावक वर्णन ऐकताना श्रोते सद्गदित झाले. कौस्तुभ परांजपे (हार्मोनिअम) आणि सिद्धार्थ कुंभोजकर (तबला) यांनी साथसंगत केली.

जोगड यांनी जीवनगौरव पुरस्कार
कार्यक्रमादरम्यान श्री शंकरमहाराज गोशाळेच्या अनिता जोगड यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. प्रकटदिन उत्सवात श्रींचा फळांच्या रसाने अभिषेक, पूजा, आरती, स्वामी स्वाहाकार, महानैवेद्य, श्रीगुरुलीलाअमृत ग्रंथ पारायण, भजनसेवा, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रम झाले. कैलास गावडे यांनी सूत्रसंचालन केले. कैलास भैरट यांनी आभार मानले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com