

रमजान ईदनिमित्त रेलचेल
कपडे, खाद्यपदार्थ, वस्तू खरेदीसाठी उशिरापर्यंत झुंबड
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३० : शहरात सोमवारी (ता.३१) रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.३०) पिंपरी, चिंचवडसह उपनगरांतील बाजारपेठा गजबजलेल्या दिसल्या. प्रामुख्याने मिठाई, खाद्यपदार्थ, सुकामेवा, कपडे, पादत्राणे, घरगुती साहित्य, शोभेच्या वस्तू आणि अन्य साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून आली.
महिनाभर केलेला ‘रोजा’ अर्थात उपवास ईदच्या दिवशी सोडण्यात येतो. ईदच्या दिवशी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. पुरुषमंडळी कुर्ता, पठाणी परिधान करतात. शहरातील पिंपरी कॅम्प, भोसरी, काळेवाडी, चिंचवड या प्रमुख बाजारपेठांत कपडे खरेदीसाठी पूर्वसंध्येला लगबग दिसून आली. बाजारात पाचशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत कुर्ता, पठाणी विक्रीसाठी उपलब्ध होते. लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी रेडिमेड ड्रेस विक्रीसाठी उपलब्ध होते. लहान मुलांच्या कापड्यांमध्येही विविध डिझाइन उपलब्ध होते. लहान मुलांचे कपडे चारशे रुपयांपासून ते चार ते पाच हजार रुपयांपर्यंत उपलब्ध होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.