शौर्य आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक २०० फूट उंचीचा भगवा ध्वज आमदार लांडगे यांची माहिती; वडमुखवाडीत भूमिपूजन

शौर्य आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक 
२०० फूट उंचीचा भगवा ध्वज
आमदार लांडगे यांची माहिती; वडमुखवाडीत भूमिपूजन
Published on

पिंपरी, ता. ३० ः भगवा ध्वज अखंड हिंदुस्थान, शौर्य, त्याग, बलिदान आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. प्रभू श्रीरामांची, वैष्णव बांधवांची विद्वत्ता, महानता सांगणारे हिंदू धर्माचे निशाण आणि वारकरी संप्रदायाची पताका आहे, असा भगवा ध्वज पिंपरी-चिंचवड शहरात दिमाखात व अभिमानाने फडकला पाहिजे, या समस्त वैष्णव बांधवांच्या मागणीला मूर्त स्वरूप देण्यासाठी चऱ्होलीतील थोरल्या पादुका मंदिराजवळ २०० फूट उंच भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. तो प्रत्येकाला हिंदू संस्कृतीचा, हिंदुत्ववादी जाज्वल्य अभिमानाचा संदेश देत राहील, अशी भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.
वडमुखवाडी, चऱ्होली येथील थोरल्या पादुका मंदिराजवळ २०० फुटी उंच भगवा ध्वज उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी आमदार लांडगे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘लाखो वारकरी देहू-आळंदी-पंढरपूर पालखीमार्गावरून वारी करतात. या मार्गावर चऱ्होलीतील थोरल्या पादुका मंदिराजवळ संतसृष्टी उभारली आहे. महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून आता वारकरी आणि हिंदू धर्माचे पवित्र निशाण असलेला भगवा ध्वज उभारला जात आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात सर्वांत उंच भगवा ध्वज उभारला जात आहे. पिढ्यान पिढ्या हा ध्वज राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रधर्मासह शिवधर्माचे विचार अभिमानाने फडकवत राहील.’’

फोटो ः 02271

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com