ताथवडे - पुनावळे - वाकड (प्रभाग क्र.२५)

ताथवडे - पुनावळे - वाकड (प्रभाग क्र.२५)

Published on

प्रभाग २५ ः ताथवडे- पुनावळे- वाकड

नवीन मतदार ठरविणार
उमेदवारांचे नशीब
- अश्विनी पवार

म हापालिका प्रभाग २५ मध्ये बहुतांश मतदार आयटी क्षेत्रातील उच्चशिक्षित आहे. मतदारांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे स्थानिकांसह सोसायट्यांतील मतदान महत्त्वाचे ठरणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक इच्छुक असून, त्यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची तयारी कमी दिसून येत आहे.

समाविष्ट भाग
माळवाडी, पुनावळे, पांढरे वस्ती, काटेवस्ती, नवले वस्ती, ताथवडे, अशोकनगर, निंबाळकरनगर, भूमकरवस्ती, वाकड, काळा खडक, मुंजोबानगर, मानेवस्ती, भुजबळ वस्ती, वाकडकर वस्ती, केमसे वस्ती, रोहन तरंग सोसायटी, प्रिस्टाईन सोसायटी, स्वरा प्राइड रेसिडेन्सी इत्यादी.

पक्षीय स्थिती
- भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त, उमेदवारीसाठी अंतर्गत चुरस
- भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पाची पकड
- शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांत इच्छुक, जनसंपर्क कमी

दृष्टीक्षेपात
- बहुतांश नवीन मतदार सोसायट्यांतील, तरुण व आयटीतील कर्मचारी ठरवणार विजेता
- बहुतेक पक्षांतील इच्छुकांची गेल्या वर्षीपासूनच तयारी
- राष्‍ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांतील इच्छुक कुंपणावर
- शिवसेनेला नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान

प्रचारातील संभाव्य मुद्दे
- रस्त्यांची कामे, वाहतूक कोंडी
- भुयारी मार्ग, पायाभूत सुविधा
- सांडपाणी, भुयारी गटारे
- कचरा व्यवस्थापन, आरोग्याचे प्रश्‍न
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com