राष्ट्रवादी फुटीनंतरही प्रभाग २० चा बाल्लेकिल्ला राखणार !

राष्ट्रवादी फुटीनंतरही प्रभाग २० चा बाल्लेकिल्ला राखणार !

Published on

प्रभाग २० ः संत तुकारामनगर, कासारवाडी, कुंदननगर
--
राष्ट्रवादी कॉंग्रेस
बाल्लेकिल्ला राखणार?
- अविनाश ढगे

महापालिका निवडणुकांमध्ये नेहमीच विविध कारणांनी प्रभाग चर्चेत राहिला आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी विविध राज्यांसह जिल्ह्यांतील नागरिक स्थायिक झाले आहेत. गेल्या काही वर्षांत मतदार वाढले आहेत. युवा मतदारांची संख्या मोठी आहे. प्रभागात नेहमीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. पण, पक्षात पडलेल्या फुटीनंतर राजकीय गणिते बदलली आहेत. काहींनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा तर काहींनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. काहीजण भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गडाला भाजपने सुरुंग लावण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीविरुद्ध भाजप असे चित्र राहू शकते.

पक्षीय स्थिती...
- २०१७ मध्ये राष्ट्रवादीचे तीन, भाजपचा एक उमेदवार विजयी
- बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीचे पारडे जड
- भाजपकडून चारही जागा लढविण्याची तयारी
- शिवसेनेचीही तयारी, कॉंग्रेसमध्ये शांतता

दृष्टिक्षेपात..
- शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांचा परिसर
- उच्चभ्रू सोसायट्यांसह झोपडपट्ट्यांचा समावेश
- शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरच्यांची संख्या अधिक
- युवांचे मतदान निर्णायक ठरणार

प्रचारातील संभाव्य मुद्दे
- दिवसाआड पाणीपुरवठा
- कचरा व सांडपाण्याची समस्या
- वाहतूक कोंडी, अतिक्रमणे
- झोपडपट्ट्यांमध्ये सुविधांचा अभाव

समाविष्ट भाग  
विशाल थिएटर परिसर, एचए कॉलनी, महेशनगर, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, वल्लभनगर, लांडेवाडी झोपडपट्टी, सीआयआरटी, पार्श्‍वनाथ सोसायटी, कासारवाडी, अग्रसेननगर, कुंदननगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com