वाचक लिहीतात

वाचक लिहीतात

Published on

फळ विक्रेत्यामुळे वाहतुकीस अडथळा

चिंचवडगावात हल्ली परप्रांतीय फळ विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांच्यातील एक माणूस फळांच्या तीन चाकी किंवा चारचाकी वाहनाजवळ विक्री करत उभा असतो. दुसरा माणूस त्या वाहनापासून पन्नास ते साठ फुटांवर हातात दोन तीन फळे घेऊन जोरजोरात ओरडत असतो. कित्येक वेळा त्या ओरडणाऱ्या माणसाचा वाहतुकीस अडथळा होऊन अपघाताची शक्यता असते. कृपया संबंधितांनी हा प्रकार ताबडतोब थांबवावा. याबद्दल मी वाहतूक पोलिस आणि महापालिकेकडे तक्रार केली. पण, काहीच उपयोग नाही. हा उपद्रव संबंधित यंत्रणांनी थांबवावा.
- प्रदीप कुलकर्णी, चिंचवडगाव


श्वान प्रेमींनो जरा लक्ष द्या
यशवंतनगरमध्ये बरेच श्‍वान प्रेमी आहेत. कातवी रस्त्याला त्यातले काहीजण बस पकडण्यासाठी येथे हेल्थकेअर मेडिकलजवळ उभे राहतात. तेव्हा, ते भूतदया म्हणून भटक्या श्वानांना बिस्किटे खायला घालून पुण्य कमवतात. परंतु त्यांनी स्वतः जिथे वास्तव्यास आहे, त्या इमारतीच्या परिसरातील भटक्या श्‍वानांना खायला घालावे व हवे तेवढे पुण्य कमवावे. इकडे श्‍वानांचा फार उपद्रव होत असतो. घाण करुन ठेवतात. रात्री- अपरात्री भुंकत राहतात. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन चालकांच्या पाठी लागतात. त्यांच्या अनेक झुंडी आहेत. श्वानप्रेमीपैकी एक-दोघांना मी समजावून सांगितले. पण, प्रश्न आहे किती जणांना सांगणार ?
- प्रकाश वा.दातार, यशवंतनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com