बेकायदा प्लॉटिंगवर
‘पीएमआरडीए’ची नजर

बेकायदा प्लॉटिंगवर ‘पीएमआरडीए’ची नजर

Published on

पिंपरी, ता. ३१ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुरंदर तालुक्यातील अवैध प्लॉटिंग रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. नव्या विमानतळाजवळील जमिनींच्या खरेदी-विक्रीत वाढ होत आहे. काही ठिकाणी विनापरवाना प्लॉटिंग सुरु असल्याच्या तक्रारी आल्याने नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून ‘पीएमआरडीए’ने पावले उचलली आहेत.
पीएमआरडीए प्रशासन अनधिकृत बांधकामाबाबत कडक भूमिका घेत आहे. चुकीचे काही आढळल्‍यास कारवाई केली जात आहे. हिंजवडी, माण, मारुंजी, चाकण, खेड आदी भागात यापूर्वी अनधिकृत बांधकामे आणि प्‍लॉटिंगवर प्रशासनाने जरब बसवली आहे. पुरंदर तालुक्यातील सुमारे १५ ‘पीएमआरडीए’च्या कार्यक्षेत्रात येतात. त्यातील तीन गावांतील जमिनी विमानतळ प्रकल्पासाठी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत सध्या जवळपास दीडशे हेक्टर जमिनीचे भूसंपादन सुरू आहे. याच काळात विमानतळाच्या नावाखाली या परिसरात प्लॉटिंग व्यवसाय वाढू लागला आहे. त्यामुळे जमिनींचे दर झपाट्याने वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिकांकडून आलेल्या तक्रारीनंतर ‘पीएमआरडीए’ने तत्काळ सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. अधिकाऱ्यांचे पथक मागील दोन दिवसांपासून विविध गावांचा दौरा करीत आहे. अनधिकृत किंवा विनापरवाना प्लॉटिंग सुरु असलेल्या ठिकाणी तपासणी केली जात आहे. या ठिकाणांवर नोटिसा बजावण्याची तयारी सुरू असून चुकीचे प्रकार आढळल्यास थेट कारवाई केली जाणार आहे.
-
सर्वेक्षण होत असलेली गावे
सध्या आंबोडी, चिव्हेवाडी, देवडी, दिवे, गुऱ्होली, जाधववाडी, काळेवाडी, केतकावळे, कुंभारवळण, पवारवाडी, सिंगापूर, सोनोरी, उदाची वाडी, वनपुरी आणि झेंडेवाडी या गावांमध्ये सर्वेक्षण सुरू आहे. अद्याप संपूर्ण पुरंदर तालुका ‘पीएमआरडीए’मध्ये समाविष्ट झाला नसला तरी या १५ गावांतील जमिनी विक्री आणि प्लॉटिंगबाबत तपासणी केली जात आहे.
---
पुरंदर परिसरात सर्वेक्षण सुरु आहे. नागरिकांनी कागदपत्रांची योग्य तपासणी करूनच प्‍लॉट खरेदी करावेत. बेकायदा प्लॉटिंगच्या विरोधात पीएमआरडीची मोहीम पूर्वीपासूनच सुरु आहे. लवकरच अहवाल प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील कारवाई होईल.
- दीप्ती सूर्यवंशी पाटील, सहआयुक्त, ‘पीएमआरडीए’
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com