गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

सेल्समनकडून दहा लाखांच्या मालाचा अपहार


पिंपरी : दुकानदाराच्‍या नावे माल देऊन दुकानदाराकडून ओटीपी घेत कंपनीची नऊ लाख ९० हजार २३० रुपयांची फसवणूक केली. ही घटना हिंजवडी येथील हायवलुप ई-काट्टमर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत घडली.
मल्लय्या विद्यानंद हिरेमठ (रा. सोलापूर), अक्षय जगन्नाथ झेंडे (रा. हिंजवडी), अकील रज्जाक शेख (रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे), मंजुनाथ गिरमल्ला गौडगांव (रा. नागणसूर), चंद्रकांत रवींद्र उमाळे (रा. सुतारआळी, पिंपळे निलख) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अण्णासाहेब पोपट देशमुख (रा. ईश्वर वठार, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे कंपनीत सेल्समन म्हणून काम करत असताना त्यांनी आपापसांत संगनमत करून दुकानदारांच्या मोबाईलवर आलेले डिलिव्हरी ओटीपी स्वतःकडे घेतले. दुकानदाराच्‍या नावाने पाठविलेला माल स्वतःकडे ठेवला. नंतर तो माल बाजारात विकला.

पिंपरीत घरफोडी प्रकरणी चोरट्याला अटक
पिंपरी : अजमेरा सेक्टरमधील एका सोसायटीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने सुमारे ९६ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
तौसिफ अब्दुल हसिफ चौधरी (वय २२, रा. माऊली फ्लोअर मिल, लालटोपीनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सागर दिलीप दड्डीकर (रा. मनोज अजमेरा सोसायटी, पी सेक्टर, अजमेरा, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. १६ ते २७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान फिर्यादी व त्यांचा मित्र शिखर श्रीवास्तव हे मूळ गावी दिवाळीसाठी गेले असताना चोरट्याने घरातून घड्याळ, चांदीचे ब्रेसलेट, स्पीकर, गॉगल, मोबाईल, मसाजगन असा एकूण ९६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.


मोशीत दाजीची मेहुण्‍याला मारहाण
पिंपरी : किरकोळ कारणावरून दाजीने मेहुण्‍याला रॉडने मारहाण करून धमकी दिली. ही घटना मोशी येथे घडली आहे.
धनेश मारुती मावकर (रा. नागेश्वर कॉलनी क्र.३, भारतमाता चौक, मोशी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सिद्धेश भास्कर पाचपुते (रा. जय भारतनगर, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे मोशी येथे पेट्रोल पंपावर कामावर असताना त्यांचा दाजी आरोपी तेथे आला. ‘माझ्या मुलाला हात का लावला ?’ असे म्हणत फिर्यादीला स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण केली.


कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बेकायदारित्या कोयता जवळ बाळगल्याप्रकरणी एकाला रावेत पोलिसांनी अटक केली. ही कारवाई किवळे येथील पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावरील करण्‍यात आली.
अब्दुल्ल आफताब अन्सारी (वय २०, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, धनगरवाडा मंदिरामागे, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा हॉटेल रानवारासमोर एका ऑटो रिक्षामध्ये बसलेला आढळला. संशयावरून पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेऊन त्‍याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता सापडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com