सकाळ संवाद
थेरगावात रोहित्राला सुरक्षा जाळी हवी 
थेरगावाच्या दत्तनगर भागात अरूण पार्क वसाहतीमधील रोहित्राची अवस्था दयनीय आहे. हा रस्ता २४ तास वर्दळीचा आहे. या रोहित्राला जाळी किंवा पत्रा लावणे अत्यावश्यक व गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाने आणि महावितरणने योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. 
- रमेश पाटील, थेरगाव 
PNE25V65068
गटारांजवळील ब्लॉकची दुरुस्ती करा
रहाटणी येथील खुळे चौकातील दोन गटारांजवळील काही पेव्हिंग ब्लॉक निखळले आहेत. तर काही गायब आहेत. मागील २० दिवसांपेक्षा जास्त काळापासून ही परिस्थिती आहे. त्याने प्रवाशांना त्रास होत आहे. या प्रकरणाची चौकशी करावी तसेच लवकरात लवकर आवश्यक दुरुस्ती केली जावी.
- रितेश निकम, रहाटणी
PNE25V65066
भटक्या श्वानांचा बंदोबस्त करा
गंगानगर प्राधिकरण पेठ क्र. २८ परिसरात भटक्या श्वानांचा भरपूर त्रास होत आहे. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक घाबरले आहेत. सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांवर आणि सोडण्यासाठी आलेल्या महिलांवर श्वान अंगावर धावून जातात. त्यामुळे येथे भितीचे वातावरण झाले आहे. महानगरपालिकेने याबाबत ठोस कार्यवाही करावी. 
- सिराज बशीर शेख, प्राधिकरण 
PNE25V65067
केशवनगरमधील कचरा साफ करा
केशवनगर येथील महापालिकेच्या मराठी शाळेच्या मागील बाजूस परिमंडळ बॉक्सजवळ कचरा साचला असून त्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका संभवतो. महापालिकेने या भागाची नियमितपणे स्वच्छता करावी. नागरिकांनीही येथे कचरा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ही विनंती.
- रमेश देव, चिंचवड
PNE25V65065
निगडी प्राधिकरणमधील सिंधूनगर येथे जलनिस्सारण वाहिनी बदलण्याचे काम चालू आहे. मुख्य गटार उघडे ठेवल्यामुळे दुर्गंधी पसरते. खड्डे बुजवले जात नाहीत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना दम्याचा त्रास होत आहे, जसे काम पूर्ण होईल, तसे खड्डे भरून त्यावर डांबर अथवा काँक्रिटीकरण करणे जरुरीचे आहे. इथे एका लहान मुलाचा अपघात झाला. त्याला चार टाके पडले. त्याला कोण जबाबदार आहे ? 
- दत्ता धामणस्कर, सिंधूनगर, निगडी
PNE25V65069
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

