सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

पावसाळी वाहिनी झाकणाची दुरुस्ती व्हावी

निगडी प्राधिकरण सेक्टर नंबर २७/अ द्वारकामाई साई मंदिर रहदारीच्या रस्त्यावर पावसाळी वाहिनीचे झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे. येथे मंदिर असल्याने तेथे भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी या झाकणची दुरुस्ती करण्यात यावी.
- सिराज बशीर शेख, निगडी
PNE25V67827

कचरा वाहतूक वाहन पडून
चिंचवड स्टेशन परिसरातील पोलिस आयुक्त वाहन कार्यशाळेजवळ नादुरुस्त अवस्थेत कचरा वाहतूक वाहन पडून आहे. वाहनांमध्ये कचरा भरून राहिला आहे. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच परिसर अस्वच्छ होत आहे.
- किरण जाधव, चिंचवड
PNE25V67824

पदपथाच्या कामांची पडझड
महापालिकेच्या स्थापत्य विभागाने ‘अर्बन स्ट्रीट’ मोहिमेंतर्गत पदपथांची कामे केली. पण, ही कामे दर्जाहीन असल्याचे दिसते. कामाची गुणवत्ता नसल्याने अल्पावधीतच पदपथ ढासळत आहेत. यापूर्वीही या ठिकाणाच्या तुटलेल्या अवस्थेतील सुविधेबाबत तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु, दुरुस्तीनंतरही अनेक ठिकाणचे दगड पुन्हा-पुन्हा निखळत आहेत. त्यामुळे स्मार्ट शहरातील कामे फक्त नाव स्मार्ट गुणवत्ता नसलेली कामे केली जात आहेत का? यासाठी कामांची गुणवत्ता तपासणी केली पाहिजे. तसेच दोषींवर कारवाई करण्यात आली पाहिजे.
- बी. एस. पाटील, शाहुनगर
PNE25V67825

Marathi News Esakal
www.esakal.com