शाळांमध्ये बालदिन उत्साहात

शाळांमध्ये बालदिन उत्साहात

Published on

पिंपरी, ता. १४ ः देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विविध शाळांमध्ये बालदिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात आले. विविध उपक्रमांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आकुर्डीतील श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत कार्यक्रमाच्या संस्थेचे संस्थापक सचिव गोविंद दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याध्यापक राजू माळे यांच्या मुख्य उपस्थितीत कार्यक्रम झाला. हर्षा जंगले यांनी प्रास्ताविक केले. वैशाली ढाकणे यांनी निवेदन केले. सुहासिनी वैद्य यांनी पंडित नेहरू यांच्या कार्याविषयी माहिती दिली. चौथीचे विद्यार्थी नागेश परूती व मितेश चव्हाण यांनी पंडित नेहरू यांच्यासारखा पोशाख परिधान केला. शिवराज हनमशेट्टी व रुद्र मिसाळ या विद्यार्थ्यांनी पंडित नेहरू यांच्याविषयी भाषणे केली. अविनाश आखाडे यांनी आभार मानले.

सयाजीनाथ महाराज विद्यालय

गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात प्राचार्य राजकुमार गायकवाड यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख नितीन वारखडे, नीलम नाईक आदी उपस्थित होते. अनुजा सोनाळे, धनश्री भालेराव, अवनी बोरुटे, प्रेमराज सलगर या विद्यार्थ्यांनी पंडित नेहरू यांच्या विषयी भाषणे केली. शिक्षक शिरीषकुमार सूर्यवंशी, शिक्षिका ज्योती भोई, दिप्ती थोरात यांनीही पंडित नेहरू यांच्या कार्याविषयी भाषणे केली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार रामभाऊ मोझे साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ मोझे, संस्थेच्या सदस्या प्रा. अलका पाटील व प्राचार्य राजकुमार गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


कै. श्रीमती गोलांडे विद्यालय

चिंचवडमधील कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापिका व उज्वला चौधरी, ज्येष्ठ शिक्षिका लता डेरे यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्या सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांनी तिन्ही भाषांतून भाषणे, कविता, कथा, गीते सादर केली. प्रश्नमंजुषा स्पर्धा, मनोरंजनात्मक तसेच ज्ञानवर्धक खेळांचे आयोजन करण्यात आले.

भारतीय जैन संघटना विद्यालय
संत तुकाराम नगर येथे भारतीय जैन संघटना संचलित प्राथमिक विद्यालयाच काव्य शिल्प संस्थेचे पदाधिकारी किरण जोशी, उमा व्यास, मीना शिंदे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. किरण जोशी यांनी ‘गवताचं पान वाऱ्यावर डोलतं’ ही कविता तसेच ससा आणि कासवाची गोष्ट सांगितली. उमा व्यास यांनी पालकांचा राग आणि संस्काराचे महत्व या विषयावर भाष्य केले. मीना शिंदे यांनी ओ माय फ्रेंड गणेशा आदी गीते सादर केली.

आचार्य श्री आनंद ऋषीजी स्कूल
शेठ श्री. रतिलाल विठ्ठलदास गोसलिया स्कूलमध्ये बालमेळावा झाला. विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद, मनोरंजनाचे खेळ खेळण्याचा नसोक्त आनंद लुटला. संस्थेचे मानद सचिव राजेंद्रकुमार मुथा, सहाय्यक सचिव प्राध्यापक अनिलकुमार कांकरिया, प्राचार्या सीमा लिंभोरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
---

Marathi News Esakal
www.esakal.com