चोरी, हरवलेले मोबाईल नागरिकांना परत
पुणे, ता. २४ : चोरी अथवा हरवलेले मोबाईल परत मिळेल, अशी फारशी अपेक्षा नसते; परंतु या घटनेत पोलिसांत तक्रार केल्यास तो परत मिळतोच, असा ठाम विश्वास वारजे परिसरातील नागरिकांना ‘हस्तगत मोबाईल वितरण’ उपक्रमातून मिळाला आहे.
वारजे-माळवाडी पोलिस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून चोरी व हरविलेल्या मोबाईलच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींवर वारजे पोलिस ठाण्याने तातडीने लक्ष देत तांत्रिक तपासाच्या आधारे शोधमोहीम राबवली. त्याचा परिणाम म्हणून एकूण ६५ चोरी गेलेले आणि हरवलेले मोबाईल पोलिसांनी शोधून काढले असून, ते ‘हस्तगत मोबाईल वितरण’ कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या मालकांना परत करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

