चिखलसेमध्ये हिवाळी शिबिर

चिखलसेमध्ये हिवाळी शिबिर

Published on

(डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय, आकुर्डी)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाचे हिवाळी शिबिर मावळ तालुक्यातील ‘चिखलसे’ गावात झाले. यामध्ये ५० स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. एन. एस. व्यवहारे, चिखलसेचे सरपंच सचिन काजळे, उपसरपंच संतोष शेंडगे, ग्रामसेवक परमेश्वर घोमसाळे उपस्थित होते. ग्रामविकास सर्वेक्षण, साथीचे आजार व रक्तक्षय (अनिमिया) यावर प्रतिबंधात्मक उपाय सांगून जनजागृती केली. ग्रामस्वच्छता व वृक्षारोपण केले. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, किशोरवयीन आरोग्य, शारीरिक स्वच्छता, योगाचे फायदे, सॅनिटरी नॅपकिनचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन केले. जलस्रोत स्वच्छता व जलप्रदूषण जनजागृती केली. गावकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. आशिष चिंबाळकर, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. पवनकुमार वानखडे व प्रा. कल्याणी सहारे आदींनी संयोजन केले.

‘शौर्यरंग’ वार्षिक क्रीडा उत्सव
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये ‘शौर्यरंग’ वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, थ्रोबॉल, रीले शर्यत, रस्सीखेच आदी खेळ झाले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संकुलाचे मुख्य वित्तीय अधिकारी बिपिन शर्मा यांनी, ‘सर्वांगीण विकासासाठी खेळाचे खूप महत्त्व आहे’, असे सांगितले. प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी मैदानी खेळांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची गोष्ट आहे तर इनडोअर खेळामध्ये मानसिक ताकद महत्त्वाची असते असे सांगितले. ‘शौर्यरंग’ क्रीडा स्पर्धेतील सुविधांसाठी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. संकुल संचालक रियर अ‍ॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी अभिनंदन केले. डॉ. वैभव वैद्य यांनी मार्गदर्शन केले. क्रीडा विभागप्रमुख डॉ. संकेत कदम, साईनाथ बरगे, वैभव पाटील, सुदर्शन कुंभार, अभिजित इनामदार आणि विद्यार्थी क्रीडा प्रमुख दिगंबर वाघ, श्रेयस तरवारे, प्रणव महाकलिवार यांनी संयोजन केले.
(90429)

रस्ते सुरक्षा जनजागृती फेरी
(राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे)
ताथवडे येथील जेएसपीएम संस्थेच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त भूमकर चौक (वाकड) ते डांगे चौक (चिंचवड) दरम्यान रॅली काढून जनजागृती केली. १२५ स्वयंसेवक सहभागी झाले होते. रस्ते सुरक्षा संबंधीचे फलक हातात होते. विद्यार्थ्यांनी ‘हेल्मेट वापरा, अपघात टाळा’, ‘वेग आवरा, जीवन सावरा’, ‘चारचाकी वाहन चालवताना बेल्टचा वापर करा’, ‘अतिघाई संकटात नेई’, ‘सिग्नलचा नियम पाळा’, ‘वाहन चालवताना मोबाईल वापरू नका’, ‘पोलिसांना सहकार्य करा’ अशा विविध घोषणा दिल्या. पोलिस निरिक्षक सुनील पिंजण, उपनिरीक्षक हेमा साळुंखे, राजेंद्र जगताप आणि कायदेतज्ज्ञ अनिल आटोळे यांनी ‘रस्ते सुरक्षा वाहतुकीचे नियम आणि नवीन कायदे’ याविषयी मार्गदर्शन केले. पिंजण म्हणाले, ‘‘सध्या पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये दुचाकींचे अपघात वाढले असून, ते अतिवेगामुळे होत आहेत. दारू पिऊन वाहन चालवू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळले आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. काही अघटित घडत असेल तर नागरिकांनी ११२ क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी.’’ संस्थेचे संचालक डॉ. संतोष भोसले, उपसंचालक डॉ. अविनाश देवस्थळी, उपसंचालक डॉ. अविनाश बडदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बोर्ड ऑफ स्टडीचे डॉ. एन. एस. मुजुमदार, अधिष्ठाता डॉ. प्रीती तोमर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब गाडेकर आदी उपस्थित होते. अक्षता काजळे, हर्षवर्धन काजळे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन निर्मिती चौधरी या विद्यार्थिनीने केले.

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर
(डॉ. अरविंद तेलंग महाविद्यालय, निगडी)
कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगडी प्राधिकरणातील डॉ. अरविंद
तेलंग वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे हिवाळी शिबिर साते (ता. मावळ) येथे झाले. विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता व मंदिर परिसराची स्वच्छता केली. सामाजिक विषयावरील पथनाट्य सादर करून प्रबोधन केले. गावालगतचा डोंगर परिसर स्वच्छ केला. विविध व्याख्याने झाली. त्यामध्ये ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन (डॉ. म. भाने), आजचे डिजिटल युवक (डॉ. बाळासाहेब सोनवणे), स्वच्छता व आरोग्य (प्रा. स्मिता पाटील), समाजमाध्यमांसाठी लेखन (प्रा. तुषार भोसले), तरुणांचे डिजिटल जग (विक्रांत शेळके), डिजिटल जग आणि सरकारी योजना (डॉ. दत्तात्रय खुणे), वातावरणावर हवामानाचा परिणाम (डॉ. शशिकांत मेम), डिजिटल क्राइम व आजचा युवक (डॉ. विकास शेवाळे) यांनी मार्गदर्शन केले. सरपंच संदीप शिंदे व सहकाऱ्यांनी मोलाची मदत केली. प्रा. डॉ. प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. वनिता लिंगायत, प्रा. शिवदीप डोंगरे, प्रा. राधिका विस्ते, प्रा. दुर्गा भिसे, प्रा. सुखदेव जाधव यांनी संयोजन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांनी अभिनंदन केले.

सॉफ्ट स्किल्स ॲंड एआय प्रशिक्षण
- जान्हवी कांबळे (आयआयसीएमआर, आकुर्डी प्राधिकरण)
प्राधिकरणातील आयआयसीएमआरतर्फे मॅजिक बस इंडिया फाउंडेशनसोबत सॉफ्ट स्किल्स आणि एआय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात मॅजिक बसचे प्रशिक्षक प्रतीक दत्त यांनी मार्गदर्शन केले. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत अर्थात सामाजिक बांधीलकीतून शिक्षण, कौशल्य विकास, तांत्रिक साक्षरता, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा या उद्देशाने कार्यक्रम आयोजित केला होता. सीएसआर अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी सॉफ्ट स्किल्स आणि तांत्रिक कौशल्यविकास कार्यक्रम, कौशल्याधारित कार्यशाळा, रोजगार क्षमतेसाठी प्रशिक्षण, पर्यावरणपूरक प्रकल्प, सामाजिक जाणीव वाढवणारे उपक्रम आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतकार्य असे विविध उपक्रम राबवले जातात. शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवकांना सक्षम करणे, सामाजिक जबाबदारीच्या तत्त्वांना प्राधान्य देणे, या उद्देशाने तांत्रिक शिक्षणाचा प्रसार, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल कौशल्यांचा विकास, मुलांसाठी आणि महिलांसाठी विशेष प्रशिक्षण, शाश्वत विकासासाठी विविध सामाजिक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. व्यावसायिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव विकसित करून त्यांना जबाबदार नागरिक बनवण्याच्या हेतूने असे कार्यक्रम राबविले जात आहेत, असे संचालक डॉ. अभय कुलकर्णी यांनी सांगितले. विभागप्रमुख डॉ. मनीषा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. समन्वयक पूजा गवांदे यांनी संयोजन केले.
(90430)

निर्भय कन्या अभियान
- वैष्णवी मुंजाळ/श्रेया लोहार (अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, चऱ्होली)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित ‘निर्भय कन्या’ अभियानात अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमधील प्रथम वर्षाच्‍या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थी विकास समितीचे सहकार्य लाभले. प्रा. ममता जीवनकर यांनी संयोजन केले. देवर्षी चक्रवर्ती यांनी मार्गदर्शन केले. संचालिका डॉ. कमलजीत कौर यांनी प्रोत्साहन दिले. प्राचार्य डॉ. एफ. बी. सय्यद, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. एस. एम. खैरनार व प्रा. अमोल पाटील उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये १७७ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सायबर सुरक्षा, मुलींचे सक्षमीकरण, सुरक्षित डिजिटल भविष्यासाठी प्रशिक्षण या सत्रांचा समावेश होता. कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे सायबर सुरक्षेचा परिचय आणि सामान्य सायबरचे धोके, सामाजिक अभियांत्रिकी याबाबत मार्गदर्शन करणे होता. सुरक्षित ऑनलाइन पद्धती, मजबूत पासवर्ड आणि सुरक्षित ब्राउझिंग सवयी, सायबर सिक्युरिटीमध्ये महिला व मुलींना करिअरची संधी याबाबतही मार्गदर्शन केले.
(90431)

‘युवोत्सव’ २७ फेब्रुवारीपासून
- रक्षंदा कुनघाडकर (एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट)
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने आंतरमहाविद्यालयीन ‘युवोत्सव’ आयोजित केला आहे. ‘युवोत्सव’चे यंदा दहावे वर्ष आहे. फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॉक्स क्रिकेट आणि बॅडमिंटन स्पर्धा २७, २८ फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी होतील. विजेत्या संघांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल. इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहाची तयारी सुरू आहे. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त आणि पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटीचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होईल. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवडकर यांनी केले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com