आणखी दोन जलतरण तलावांची कंत्राटे देणार

आणखी दोन जलतरण तलावांची कंत्राटे देणार

Published on

पिंपरी, ता. १६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तेरा जलतरण तलावांपैकी दहा जलतरण तलाव ठेकेदारांच्या ताब्यात गेले असून उर्वरित तीनपैकी दोन तलाव ठेकेदारांच्या घशात घालण्याचा डाव महापालिकेने घातला आहे. त्यामुळे, काही दिवसांनी सर्व जलतरण तलाव ठेकेदारांच्या ताब्यात जाणार असल्याचे दिसून येत आहे. तलावांवर होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड आणि आकुर्डी-प्राधिकरणातील तलावांसाठी नव्याने निविदा प्रसिद्ध केली असून तीन मार्च रोजी ती काढली जाणार आहे. त्यामुळे मोहननगर येथील केवळ एकच जलतरण तलाव स्थापत्यविषयक कामामुळे ठेकेदारांच्या ताब्यात जाण्यापासून राहणार आहे. तिकीट विक्री, स्वच्छता, सुरक्षा, पाणी शुद्धीकरणासह सर्व कामकाज या ठेकेदारांच्या संस्था पाहणार आहेत. जलशुद्धीकरण, सुरक्षा, स्वच्छता, जीवरक्षक, पर्यवेक्षक आदींवर महापालिकेचा कोट्यवधी रूपयांचा खर्च होत आहे. आता या पैशाची बचत होणार असा दावा महापालिकेने केला आहे. मात्र, यामुळे ठेकेदारांची मनमानी चालत असून त्यांना परवडणारे शुल्क आकारले जात आहेत. तसेच तलावातील पाणी अस्वच्छ असल्याच्या तक्रारीही काही नागरिकांनी मांडल्या आहेत.


सुटीच्या दिवशी मी माझ्या मुलांना घेऊन जलतरणाचा आनंद घेतो. पूर्वी तलाव महापालिकेच्या ताब्यात असताना पाणी स्वच्छ असायचे. परंतु आता काही वेळा अस्वच्छ पाणी असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने याबाबत ठेकेदारांना सूचना द्याव्यात. त्यामुळे नागरिकांना होणारे संभाव्य आजार टळतील.
- सुमीत खोल्लम, सांगवी, नागरिक

जलतरण तलावांवर होणारा खर्च हा अधिक असल्याने ठेकेदारांना हे तलाव वापरण्यासाठी दिले आहेत. त्यांच्याकडून महिन्याला ७५ ते ८० हजार रूपयांचे भाडे महापालिकेला मिळत आहे. हे भाडे पूर्वी मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक आहे. त्यामुळे उर्वरित दोन तलावांची निविदा देखील काढण्यात आली आहे.
- अनिता केदारी, क्रीडा अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com