‘शहरातील साहित्य संस्थांनी
एकजुटीने काम करावे’

‘शहरातील साहित्य संस्थांनी एकजुटीने काम करावे’

Published on

पिंपरी, ता. १६ ः ‘‘पिंपरी चिंचवड शहरात अनेक साहित्य संस्था साहित्यसेवा करीत आहेत. त्यामुळे साहित्य संवर्धन निश्‍चित होत आहे. साहित्य आणखी समृद्ध व्हावे म्हणून शहरातील सर्वच साहित्य संस्थांनी यापुढे एकजुटीने काम करावे,’’ असे मत कवी अनिल दीक्षित यांनी व्यक्त केले.
शब्दधन काव्यमंच या संस्था सन्मान सावित्रीच्या लेकींचा मंच या संस्थेच्यावतीने नुकताच करण्यात आला. यावेळी अनिल दीक्षित बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर आंगोळकर यांच्या हस्ते संस्थेचा गौरव करण्यात आला. सावित्रीच्या लेकींचा मंचाच्या अध्यक्ष रविना आंगोळकर, राधा वाघमारे, आय. के. शेख, जयश्री गुमास्ते, सूर्यकांत कुरुलकर, मुरलीधर दळवी, प्रकाश घोरपडे, फुलवती जगताप, स्टेला गायकवाड, रूपाली चौधरी, श्रुतिका ढोबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तानाजी एकोंडे यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com