डंपरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक जखमी
पिंपरी : भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. ही घटना भोसरी येथे घडली. नवलकुमार सिद्धप्पा ढवणे (वय ६५) असे या अपघातात जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद नवलकुमार ढवणे (रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुनु विनोद यादव (वय ३०, रा. मोहननगर, बाणेर, मूळ - बिहार) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे वडील नवलकुमार ढवणे हे दुचाकीवरून घरी येत असताना आळंदी ते भोसरी रस्त्यावर मयूरी पॅलेससमोर आरोपीने त्याच्या ताब्यातील भरधाव डंपरने नवलकुमार यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. दुचाकीचेही नुकसान झाले.
हुक्काप्रकरणी दोघांवर गुन्हा
पिंपरी : हॉटेलमधील हुक्का पार्लरवर बावधन पोलिसांनी कारवाई करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. लवळे नांदे रस्त्यावरील कॅफे मिंट नावाच्या हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी हॉटेलचा मॅनेजर कैलास तुकाराम मराठे (वय २८) व शुभम प्रमोद गायकवाड (वय २४, दोघेही रा. कर्वेनगर, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी हॉटेलमध्ये हुक्क्याचा वेगळा झोन न करता ग्राहकांची गर्दी करून त्यांना जेवणास व हुक्क्यास एकत्र बसवले. बेकायदारित्या साडेआठ हजार रुपये किमतीचा हुक्का पॉट व हुक्का फ्लेवर विक्रीसाठी जवळ बाळगला.
गॅस सिलेंडरचा काळाबाजार; एकावर गुन्हा
पिंपरी : गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने कारवाई करून एकावर गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर शंकर यौगाजी (वय २१, रा. मु. पो. नांदे, ता. मुळशी, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपीने घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमधून धोकादायकरित्या गॅस काढून छोट्या आकाराच्या दुसऱ्या सिलेंडरमध्ये भरला. त्यानंतर त्या गॅसच्या टाक्या लोकांना चढ्या दराने विकल्या. पोलिसांनी याठिकाणी कारवाई करून ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
दुचाकीच्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी
पिंपरी : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत दुसऱ्या दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना चिखलीतील साने चौकाजवळ घडली. याप्रकरणी दिलीप चिंतामणी चव्हाण (रा. साने चौक, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचे मेहुणे सुनील महादेव राठोड (वय २३) हे चिखली ते आकुर्डी रस्त्याने जात असताना साने चौकाजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी व चव्हाण हे गंभीर जखमी झाले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

