येत्या २५ तारखेपर्यंत निश्चिती द्या पात्र सदनिकाधारकांना ‘पीएमआरडीए’कडून संदेश
पिंपरी, ता. १६ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआआरडीए) सदनिकांसाठी नुकतीच सोडत काढण्यात आली. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना प्रशासनाकडून संदेश पाठविण्यात आला आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत सदनिका घेणार किंवा नाही याबाबत निश्चिती द्यायची आहे. त्यानंतर २६ तारखेपासून पैसे भरण्यास सुरवात होणार आहे, अशी माहिती जमीन व मालमत्ता विभागाचे उपायुक्त हिंमत खराडे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच ‘पीएमआरडीए’च्या सदनिकांची सोडत काढण्यात आली. यामध्ये पेठ क्रमांक १२ तसेच पेठ क्रमांक ३० आणि ३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत ही निवड यादी जाहीर केली आहे. एकूण १ हजार ३३७ सदनिकांपैकी १०१५ सदनिकांसाठी निवड यादी जाहीर केली आहे. तर, एकूण ५७८ जणांची प्रतीक्षा यादी देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
निवड यादीतील ज्या सदनिकाधारकांना सदनिका नाकारायची असेल, त्यासाठी त्यांना २५ तारखेपर्यंत मुदत दिली आहे. अनेक वेळा एकाच घरातून दोघांनी अर्ज दाखल केलेले असतात. तसेच काहींनी म्हाडाच्या सदनिकांना देखील अर्ज केले आहेत. त्यामुळे सदनिका नाकारणाऱ्यांची संख्या अधिक असू शकते. या पार्श्वभूमीवर ही मुदत दिली आहे. २६ तारखेपासून सदनिकांसाठी सुरवातीला भरलेली अनामत रक्कम वगळता सदनिकाधारकांकडून अन्य १०० टक्के रक्कम भरून घेण्याची कार्यवाही सुरु होणार आहे. अनेकांना त्याच दिवशी संदेश पाठवून ही माहिती दिली आहे. लाभार्थ्यांना आपल्या लॉगिन आयडीवर देखील हे पाहता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

