बांधकामे अधिकृत करण्यास थंड प्रतिसाद!
पिंपरी, ता. १८ : गुंठेवारी कायद्यांतर्गत बांधकामे अधिकृत करून घेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुन्हा मुदतवाढ दिली आहे. पूर्वी ३१ मार्च ही मुदत होती. आता ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. मालमत्ताधारकांचा थंड प्रतिसाद पाहता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
गुंठेवारीसाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये नव्याने अर्ज मागविण्यात आले होते. तेव्हा फक्त ५८ अर्ज प्रशासनाकडे आले. त्यापैकी केवळ सहा बांधकामे नियमित झाली आहेत. दरम्यान, ‘पीएमआरडीए’ प्रशासनाने गुंठेवारी कायद्यांतर्गत बांधकामे नियमित करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. गुंठेवारीअंतर्गत बांधकामे नियमित करण्यासाठी सध्या ‘अॅम्नेस्टी’ योजना लागू आहे. त्यानुसार गुंठेवारी कायद्यामध्ये सुधारणा करून ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचे गुंठेवारी पद्धतीने विकसित झालेले अनधिकृत भूखंड, बांधकामे नियमित करण्याची संधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार अनधिकृतरित्या विकसित झालेल्या गुंठेवारी स्वरुपातील भूखंड, बांधकामांचे नियमितीकरण करण्याचे धोरण ‘पीएमआरडीए’ने अवलंबले आहे. त्यासाठी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रगटन प्रसिद्ध केले होते. दरम्यान, आता ३१ मार्चपर्यंत मंजूर होणाऱ्या प्रकरणांना प्रशमन शुल्कात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. दरम्यान, बांधकामे नियमित करण्याबाबत आलेल्यांपैकी काही अर्ज अमान्य झाले. तर, काही प्रकरणांत कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत अर्जदारांना सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

