‘लहुवंदना’ पाठांतर स्पर्धेत अनन्या, पूनम प्रथम
पिंपरी,ता. १८ : क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या १४४व्या पुण्यतिथीनिमित्त ‘लहुवंदना’ पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये वैयक्तिक गटातून अनन्या काळबांडे, खुल्या गटातून पूनम धुतडमल आणि सांघिक गटातून थेरगावच्या खिंवसरा पाटील विद्यामंदिर संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती व मंगल प्रवाह सोशल कॅम्पिनिंग यांच्यावतीने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, अभिनेते सुरेश विश्वकर्मा, ज्येष्ठ व्याख्यात्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा कुलकर्णी, लहुजी साळवे स्मारक समितीचे अशोक लोखंडे, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर प्रकाश ढवळे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, अनिल सौंदडे, नितीन घोलप यांच्यासह सहभागी शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
शाहीर आसराम कसबे यांनी प्रास्ताविक केले. विजेत्यांना रोख बक्षिसांसह लेखनसाहित्य प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ॲड. हर्षदा पोरे यांनी सूत्रसंचालन, बालाजी मोरे यांनी आभार मानले.
स्पर्धेतील विजेते
वैयक्तिक गट :
द्वितीय क्रमांक : भूमिका खंडागळे
तृतीय क्रमांक : आरिफ शाह
उत्तेजनार्थ : आतिश कोळेकर
सांघिक गट :-
द्वितीय : जयवंत प्राथमिक शाळा,भोईरनगर
तृतीय : लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय लहु कन्या ग्रुप, थेरगाव
खुला गट :-
द्वितीय क्रमांक : प्रज्ञा फुलपगार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

