श्री गजाजन महाराज प्रकट दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम

श्री गजाजन महाराज प्रकट दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम

Published on

पिंपरी, ता. १८ : प्राधिकरण येथील श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १९ ते २७ फेब्रुवारी या दरम्यान गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता.१९ ) सकाळी महाराजांच्या पादुकांचे पूजन व अभिषेक करून महोत्सवाला सुरुवात होईल. तर, सायंकाळी पालखीची मिरवणूक काढण्यात येईल. गुरुवारी (ता.२०) सकाळी काकड आरती, महापूजा, भक्तिगीत सादरीकरण असे धार्मिक कर्यक्रम होतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ पिसे यांनी दिली.
दरम्यान, मंदिरात गुरुवारी दिवसभर रॉबिनहूड आर्मी, निसर्गराजा, मित्र जीवांचे या संस्थांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर होणार आहे. दुपारी महाप्रसाद, अभंगवारी, सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी सहा वाजता ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन होईल. या शिवाय २७ फेब्रुवारीपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. महाशिवरात्रीला महाभिषेक, रुद्राभिषेक व आरती होईल २७ फेब्रुवारीला महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com