

चिखली, ता. १८ : वीरशैव समाजात जैनांची अहिंसा, बौद्धांची समता, ख्रिस्तांची करुणा, द्रविडांची भक्ती, निष्ठा, ज्ञान, भक्ती असे गुणधर्म सामावलेले आहेत. वीरशैव समाजाची महानता सांगताना इतर धर्माचे देखील पावित्र्य आमच्याकडून जपले जाते,’’ असे उद्गार माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी काढले.
हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्यावतीने, चिखली येथे आयोजित तिसऱ्या वीरशैव समाज महामेळाव्यात ते बोलत होते. डॉ. अभिनव चन्नमलेश्वर शिवाचार्य महास्वामी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, एटीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास स्वामी, अभिषेक विद्यालयाचे अध्यक्ष
गुरुराज चरंतीमठ, पंचांप्पा मेनसे, सामाजिक कार्यकर्ते विकास साने, हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचे अध्यक्ष आयोजक सतीश पाटील, गणेश पाटील, आकाश पाटील, मंगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. महास्वामी म्हणाले, ‘‘हाताची पाच बोटे ही सारखी नसली तरी ते जेवणाचा घास घेताना ती एकत्रित येऊन मुखात जातात. त्या बोटांप्रमाणे वीरशैव समाजात विविध जाती आहे. पण, सामाजिक कार्यात वीरशैव समाजाने मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे.’’
डॉ. अभिनव महास्वामी यांनी संगत सज्जनासोबत केली; तर फळ चांगले मिळेल. जीवनात अध्यात्म किती महत्वाचे आहे ? या विषयावर कन्नड भाषेत मार्गदर्शन केले. राजू जाधव यांनी सूत्रसंचालन केले; तर सुनील शेवाळे यांनी आभार मानले. चंद्रशेखर पाटील, इरान्ना पाटील, सुरेश पाटील, राजू पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष परिश्रम घेतले.
PNE25U91004
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.