अजिंक्य शिंदे, राखी गुगळे यांना सुवर्ण

अजिंक्य शिंदे, राखी गुगळे यांना सुवर्ण
Published on

पिंपरी, ता. १८ ः केरळ योगा असोसिएशन आणि केरळ राज्य क्रीडा परिषद यांच्यावतीने त्रिवेंदम येथे आयोजित ४९ व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या १८ ते ३५ वर्षे गटात (वरिष्ठ गट) अजिंक्य शिंदे याने तर ४५ वर्षांपुढील महिलांच्या गटात राखी गुगळे यांनी सुवर्णपदके पटकाविली. याखेरीज महाराष्ट्राच्या आणखी सहा योगपटूंनी पदके प्राप्त केली.
योगा फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने वरील स्पर्धा भरविण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन, क्रीडा मंत्री अब्दुरहिमान आणि योगा फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष इंदु अशोक अग्रवाल यांच्या हस्ते झाले. अजिंक्य शिंदे याने आर्टिस्टिक सोलो प्रकारात तर राखी गुगळे यांनी ट्रॅडिशनल योगा प्रकारात वरील कामगिरी नोंदविली. योगेश्वर सानप यांनी (३५ ते ४५ वर्षे) ट्रॅडिशनल योगामध्ये द्वितीय, रुचिता वल्पा हिने आर्टिस्टिक सोलोमध्ये (१८ ते ३५ वर्षे) तर सीमा पवार यांनी (३० ते ३५ वर्षे), रमा झा (३५ ते ४५ वर्षे) यांनी ट्रॅडिशनल योगामध्ये तृतीय स्थान प्राप्त केले. याशिवाय, संगीता नाष्टा यांनी (४५ वर्षांपुढील), अमोल म्हस्के यांनी ट्रॅडिशनल योगा प्रकारात द्वितीय स्थान मिळविले.
आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते चंद्रकांत पांगारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील एकूण ३८ योगपटू स्पर्धेत सहभागी झाले. त्यातील वरील योगपटूंनी चमकदार कामगिरी नोंदविली. सर्व पदक विजेत्या योगपटूंचा पुणे डिस्ट्रिक्ट योगा ॲण्ड फिटनेस इन्स्टिट्यूट आणि बजाज ऑटोच्या ‘प्राणा’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
PNE25U91068

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com