शिवजयंतीची उत्कंठा शिगेला

शिवजयंतीची उत्कंठा शिगेला
Published on

पिंपरी, ता. १८ ः ठिकठिकाणी भगवे झेंडे खरेदी करण्यासाठी झालेली गर्दी, वाहनांवर लावण्यात आलेले झेंडे, शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची झालेली तयारी, शिवज्योत आणण्यासाठी मार्गस्थ झालेले सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते, चौकाचौकांत उभ्या केलेल्या कमानी, असे वातावरण पिंपरी-चिंचवड शहरात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दिसून आले.
शहरातील भक्ती-शक्ती चौक, थेरगाव, दापोडी, डांगे चौक, भोसरीतील लांडेवाडी आणि पीएमटी चौक, चऱ्होलीतील वाघेश्‍वर मंदिर परिसर, चिखली गावठाण, एचए वसाहत, पिंपरी, कासारवाडी या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराची सजावट करण्यात आली आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी ढोल-ताशा, लेझीम पथके सराव करताना दिसले. शहरातील विविध सार्वजनिक मंडळे तसेच सोसायट्यांमध्येही शिवजयंतीच्या तयारीची लगबग दिसून आली. शिवाजी महाराजांच्या जीवनाचे दर्शन घडविणारे नृत्य, नाटक व पोवाडे अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शिवजयंतीच्या सुट्टीचे औचित्य साधून शिवनेरी तसेच शहरापासून जवळच असणाऱ्या किल्ल्यांवर गिरी मोहिमा राबविण्याचे नियोजन तरुण करताना दिसले. याशिवाय शिवजयंती निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असले तरी अनेक घरांमध्येही शिवजयंती साजरी केली जाते. त्यामुळे घरोघरीही शिवजयंतीची सजावट करण्याची लगबग दिसून आली. शिवजयंतीच्या एक दिवस आधीपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम सांगणारे स्टेटस शिवभक्तांनी सोशल मीडियावर अपलोड केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com