देहू नगरपंचायतीचा ९८ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
देहू, ता. १८ : देहू नगरपंचायतीच्या वतीने सन २०२५-२०२६ या वर्षासाठी ९७ कोटी ९९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी नगरपंचायतीच्या झालेल्या विशेष अर्थसंकल्पीय सभेत मंजूर करण्यात आला. गेल्या वर्षी ४३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. या वर्षी भांडवली जमा वाढलेली दर्शविण्यात आल्याने सुमारे ५० कोटी रुपये वाढीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
नगराध्यक्षा पूजा दिवटे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, सदस्य मयुर शिवशरण, योगेश परंडवाल, आदित्य टिळेकर, योगेश काळोखे, सदस्या स्मिता चव्हाण, ज्योती टिळेकर, प्रियंका मोरे, रसिका काळोखे, पूनम काळोखे, पूजा काळोखे, कार्यालयीन अधीक्षक प्रियंका कदम, कर अधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, संघपाल गायकवाड, लेखापाल केशव पिनाटे, रामदास भांगे व इतर उपस्थित होते.
या अर्थसंकल्पात महसुली उत्पादन २४ कोटी २८ लाख रुपये आहे. फी वापरकर्ता आकार आणि द्रव्यदंड यातून १० कोटी रुपये जमा होणार आहेत. तर, आस्थापनावर २ कोटी ६० लाख रुपये खर्च, प्रशासकीय खर्च ४ कोटी ७३ लाख रुपये दर्शविण्यात आला आहे.
शासकीय अनुदान आणि विकास कामांसाठी भांडवली जमा ६६ कोटी ६४ लाख रुपये दर्शविण्यात आलेली आहे. भांडवली खर्च ७७ कोटी ७९ लाख रुपये खर्च होणार आहे. इमारत व जागा यावर अंदाचे ८० लाख, रस्ते १२ कोटी ५० लाख, पूल बांधणे ७० लाख, पाणीपुरवठा व जलवाहिनी टाकण्यासाठी १० कोटी, गटारे व नाले नवीन लाइन टाकण्यासाठी १० कोटी, स्मशानभूमी विकासासाठी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
----------------
शासनाकडून नवीन योजनांसाठी भांडवल उपलब्ध होणार आहे. विकास कामांसाठी ७७ कोटी रुपये खर्च होणार आहेत. ४३ कोटी रुपयांच्या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे.
- निवेदिता घार्गे, मुख्याधिकारी, देहू नगरपंचायत
---------
इन्फो बॉक्स
ःप्रस्तावित जमा आणि खर्च
---------
१० कोटी १९ लाख रु.
करातून जमा होणारी रक्कम
-----------
२० कोटी १८ लाख रु.
महसुली खर्च
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

