हिंजवडी परिसरातील वाहतुकीत बदल

हिंजवडी परिसरातील 
वाहतुकीत बदल
Published on

पिंपरी, ता. १८ : हिंजवडी येथे शिवजयंती उत्सवानिमित्त बुधवारी (ता. १९) मिरवणुकीचे आयोजन केले आहे. या दरम्यान, परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात येणार आहे.
कस्तुरी चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहने मारुंजी वाय जंक्शन चौकाकडून कस्तुरीचौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारी वाहतूक ही कस्तुरी चौक येथून उजवीकडे वळून विनोदे वस्ती मार्गे व डावीकडे वळून इंडियन ऑइल चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच मेझा-९ चौकाकडून हिंजवडी गावठाणाकडे जाणारी वाहने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सरळ पुढे इंडियन ऑईल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती मार्गे इच्छित स्थळी जातील. यासह इंडियन ऑइल चौक व साखरे वस्तीकडून हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहने जांभूळकर जीम चौकातच यु टर्न घेवुन परत इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

तसेच मेझा-९ चौकाकडून श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या दोन लेन पैकी डावी लेन बंद करून सर्व वाहतूक ही उजव्या बाजूच्या लेनने सुरु राहणार आहे. हा बदल दुपारी तीन ते रात्री अकरा या कालावधीत असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com