सरसकट पाडापाडीचे
समर्थन नाही ः लांडगे  
कुदळवाडीतील अतिक्रमण विरोधी कारवाई - लोगो

सरसकट पाडापाडीचे समर्थन नाही ः लांडगे कुदळवाडीतील अतिक्रमण विरोधी कारवाई - लोगो

Published on

पिंपरी, ता. १८ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेने कुदळवाडी परिसरात ८२७ एकर क्षेत्रावर अतिक्रमण विरोधी कारवाई केली आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कारवाई योग्य आहे. मात्र, सरसकट कारवाईमुळे लघुउद्योजक आणि भूमिपुत्रांचेही नुकसान झाले आहे. याचे समर्थन कदापिही केले जाणार नाही, याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारचे लक्ष वेधणार आहोत, अशी भूमिका भाजपचे नेते व आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी मांडली.
महापालिकेने चार हजार १११ अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. यामध्ये तीन कोटी ६० लाख ५८ हजार ७४६ चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे काढली आहेत. यामुळे रस्ता आणि आरक्षण असलेले महापालिका मालकीचे सुमारे शंभर एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त झाले आहे. याबाबत आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाकडून कुदळवाडी-चिखली परिसरातील महापालिकेने अनधिकृत भंगार व्यावसायिक, अवैध धंदे आणि इंद्रायणी नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कारवाई केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईसाठी महापालिका व पोलिस प्रशासनाला पाठबळ दिले. याबाबत मुख्यमंत्री आणि प्रशासनाचेही आभार व्यक्त करतो.
अतिक्रमण कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जाहीरपणे व्यक्त न होता प्रशासनाला सहकार्य करण्याचे ठरवले होते. मात्र, प्रशासनाने केलेल्या सरसकट कारवाईमुळे ५५९ लघुउद्योजक आणि भूमिपुत्रांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे स्पष्ट भूमिका मांडत आहे. सरसकट कारवाईचे कदापि समर्थन करणार नाही. याबाबत महापालिका आणि राज्य सरकारकडे दाद मागणार आहे, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
फोटो ः 91141.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com