राडारोडा हटवण्यात कमालीची दिरंगाई
राडारोडा हटवण्यात कमालीची दिरंगाई
जुना उर्से टोल नाका येथील प्रकार : अपघाताची भीती
सोमाटणे, ता. १९ : द्रुतगती मार्गावर जुन्या उर्से टोल नाका येथील राडरोडा हटवण्यात कमालीची दिरंगाई केली जात आहे. या मंदगती कारभारामुळे येथे अपघाताची भीती आहे. शिवाय, वाहतुकीला यामुळे अडथळा निर्माण होत आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से येथील नवीन टोलनाक्याचे काम चार महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. यानंतर उर्से येथील पूर्वीचा टोल नाका मुंबई दिशेला चार किलोमीटर अंतरावर नेण्यात आला. यानंतर जुन्या टोलनाक्याचे पक्के बांधकाम, शेड, टोलबुथचे फाउंडेशन, संरक्षक कठडे तातडीने हटवणे गरजेचे होते. परंतु रस्त्याची व्यवस्था पाहणाऱ्या ‘आयआरबी’ कंपनीने याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप केला जात आहे.
दरम्यानच्या काळात याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रकाशित होताच आयआरबी कंपनीने राडारोडा हटवणे सुरू केले. परंतु, हे काम मंदगतीने सुरू असल्याने गेल्या चार
महिन्यानंतरही टोल बुथचे शेड, फाउंडेशन व संरक्षक कठडे हटवण्याचे काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत असून अपघातालाही निमंत्रण ठरणारे आहे. रात्रीच्या वेळी वाहन चालवताना टोलनाक्याचा राडारोडा लक्षात न आल्यास दुर्घटना घडण्याची भीती आहे.
------------
टोलनाक्याचा राडारोडा हटवण्याचे काम तातडीने सुरू केले असून लवकरच ते पूर्ण होईल. यामुळे वाहतुकीसाठी रस्ता मोकळा होणार आहे.
- डी. ए. के. जोसुआ, कार्यकारी संचालक, सुरक्षा विभाग, ‘आयआरबी’
-----------
फोटो- उर्से-जुन्या टोलनाक्याचा रस्त्यात पडलेला राडारोडा.Smt19Sf1.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

