‘परमवीरांगना-मिशन शक्ति’ सोहळा उत्साहात
पिंपरी, ता. १९ : डिफेंस फोर्स लीग व डीआयएफटी फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘परमवीरांगना-मिशन शक्ति’ सोहळा चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये आयोजित करण्यात आला. प्रामुख्याने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‘परमवीरांगना’ पुरस्काराने गौरवण्यात आले. यामध्ये पहिला परमवीरांगना जीवन गौरव पुरस्कार पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी राज्यपाल निर्भय शर्मा, ‘आयआयएसइआर’चे डॉ. अरविंद नातू, मिझोरम व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल ले. ज. निर्भय शर्मा, ‘डीएफएल’चे संस्थापक नरेश गोल्ला, ले. जनरल माधुरी कानिटकर, पॅराविंग प्रेसिडेंट माजी कमांडो रघुनाथ सावंत आणि १९७१ भारत पाक युद्धातील पूर्व सेनानी उपस्थित होते.
या प्रसंगी विशेष ‘मेडल ऑफ ऑनर’ पुरस्कार डॉ. नातू, औ. शि. मंडळाचे ट्रस्टी डॉ. आशा पाचपांडे, लोणावळा येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळूंज आणि दिवाण हॉस्पिटल यांना प्रदान करण्यात आला. शहीद कर्नल संतोष महाडिक (शौर्यचक्र) यांच्या पत्नी मेजर स्वाती महाडिक यांना विशेष परमवीरांगना पुरस्कार प्रदान केला. यानंतर बेलराइज इंडस्ट्रीजच्या (बडवे इंजिनिरिंग) एक्झिक्युटिव डायरेक्टर सुप्रिया बडवे, एमआयटी-एटीडी विद्यापीठाच्या संचालक डॉ. सुनीता कराड, सूर्यादत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या प्रो. डॉ. शीला हुंडेकरी, प्रो. प्रीतम चव्हाण, एसकेएफ कंपनीच्या एचआर मॅनेजर नेहा मुखिया-परळकर यांनादेखील या वेळी गौरवण्यात आले..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

