फेब्रुवारीपासूनच उन्हाळ्याच्या झळा बदललेल्या हवामानामुळे आरोग्याच्या तक्रारीत वाढ

फेब्रुवारीपासूनच उन्हाळ्याच्या झळा
बदललेल्या हवामानामुळे आरोग्याच्या तक्रारीत वाढ
Published on

पिंपरी, ता. १९ ः मार्चमध्ये लागणारी उन्हाळ्याची चाहूल यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच लागली आहे. दुपारी पडणाऱ्या कडक उन्हामुळे ऐन फेब्रुवारीतही घामाच्या धारा लागत आहेत. दुपारी उन्हाच्या झळा व सकाळी गारवा असे वातावरण सध्या शहरात अनुभवायला मिळत आहे. या बदललेल्या हवामानामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या असून, वेळीच योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
विषम वातावरण व प्रदूषणाची भर
बदलेल्या हवामानामुळे दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी उन्हाळ्याच्या झळा लवकर लागायला सुरवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सर्दी खोकल्यासारखे विषाणूजन्य आजार वाढले आहेत. त्यातच शहरातील वाढलेले प्रदूषण, चालू असलेल्या बांधकामांमुळे उडणारी धूळ याची भर पडल्यामुळे ॲलेर्जेटिक सर्दी खोकल्याचेही प्रमाण वाढले आहे. अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे थंड पदार्थांचे सेवन केले जात आहे, हे देखील आजारांचे कारण असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

दम्याच्या रुग्णांच्या त्रासात वाढ
सकाळी गारवा व दुपारी कडक ऊन या विषम वातावरणाचा सर्वाधिक त्रास दम्याच्या रुग्णांना होत आहे. दमा असणाऱ्यांना सर्दी, खोकला झाल्यास अस्वस्थ वाटणे, श्‍वास घ्यायला त्रास होणे यांसारख्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांपैकी पाच ते दहा टक्के रुग्णांना ॲडमिट करण्याची गरज भासत असल्याची माहिती डॉ. चंद्रशेखर अन्नदाते यांनी दिली.

असे जपा आरोग्य
- बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे
- थंड व फ्रीजमधील पाणी व पदार्थांचे सेवन टाळावे
- शीतपेय पिणे टाळावे
- ऋतूमध्ये मिळणाऱ्या फळांचे सेवन करावे
- पचायला सोपे व हलक्या पदार्थांचे सेवन करावे
- ताजे व गरम अन्न खावे
- बाहेर पडताना मास्क, टोपी व गॉगलचा वापर करावा


‘‘उन्हाळा लवकर सुरू होण्याचे कारण हे ग्लोबल वॉर्मिंग असू शकते. वाढलेल्या तापमानासोबतच आपल्या शहरात वाढलेले प्रदूषण, हवेमध्ये धुळीचे वाढलेले प्रमाण यामुळेही सध्या सर्दी, खोकल्यासारख्या विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. उन्हाळ्याचा चटका वाढला की थंड किंवा बर्फयुक्त पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र, यामुळे आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे सध्याच्या विषम हवामानात थंड पदार्थांचे सेवन टाळणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे.’
- डॉ. चंद्रशेखर अन्नदाते, वैद्यकीय तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com