शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
शाळा, महाविद्यालयांत शिवविचारांचा जागर
पिंपरी, ता. १९ ः शहरातील मराठी, इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांसह विविध महाविद्यालयांमध्ये बुधवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा, महाविद्यालयांमध्ये सकाळपासूनच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थी बाल शिवाजी, युवा शिवाजी, राजमाता जिजाऊ, हिरकणी, येसूबाई, मावळे अशा विविध वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते.
-------------
ज्ञानसागर इंग्लिश मीडियम शाळा, चिखली : येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मयुर जगताप, शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
-------------
श्री गुरुगणेश बालक मंदिर : श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या संस्थेत शिवजयंतीनिमित्त ‘शिवजीवन चरित्र’ यावर आधारित प्रसंग दाखविण्यात आले. मुख्याध्यापिका लता पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी अॅड. राजेंद्रकुमार मुथा व सहायक सेक्रेटरी प्राचार्य अनिलकुमार कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या.
------------
नवमहाराष्ट्र प्राथमिक व माध्यमिक विद्यालय : शिक्षिका हेमलता वाघ आणि हेमलता कोकणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले व प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी आणि नाटक सादरीकरण केले. विद्यार्थिनी अंकिता गोरे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आरोही मस्के हिने आभार मानले.
-------
संतपीठ शाळा, चिखली टाळगाव : येथे शिवाजी चौक ते संतपीठ शाळेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थी व शिक्षकांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी व शिक्षकांनी लेझीम व टाळ पावली खेळून आनंद साजरा केला. शिवगर्जना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शाळेचे संचालक ह.भ.प.राजू महाराज ढोरे, संचालिका डॉ. स्वाती मुळे, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार, समन्वयिका मयुरी मुळूक आदी यावेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

