माता रमाई स्‍मारकाच्‍या मागणीसाठीचे आंदोलन स्‍थगित

माता रमाई स्‍मारकाच्‍या 
मागणीसाठीचे आंदोलन स्‍थगित
Published on

पिंपरी, ता. २५ : वंचित बहुजन आघाडीच्‍या वतीने सुरू असलेले माता रमाई स्‍मारकाच्‍या मागणीसाठीचे आंदोलन तात्‍पुरते स्‍थगित करण्यात आले आहे. पिंपरीतील पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) आरक्षित जागेचे आरक्षण भीमसृष्टीसाठी बदलण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंजुरी दिली. त्‍याबाबतचा ठराव दिल्‍यानंतर हे आंदोलन स्‍थगित करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाने दिलेल्‍या मुदतीत स्‍मारकाबाबत पुढील विचार न केल्‍यास तीव्र आंदोलन छेडणार असल्‍याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
माता रमाई आंबेडकर स्‍मारकासाठी वंचित बहुजन आघाडीचे शहर सचिव राजेंद्र साळवे आंदोलनाला बसले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त चंद्रकांत इंदलकर यांनी याबाबत आंदोलनस्‍थळी जाऊन महापालिकेच्‍या ठरावाची प्रत सुपूर्द केली. ठरावामध्ये नमूद करण्यात आले की, २१ जानेवारी रोजी आयुक्त शेखर सिंह यांनी पीएमपीएमएलच्‍या व्यवस्थापकीय संचालकांसोबत जागा पाहणी केली आहे. महापालिकेमार्फत पुन्‍हा अभिप्राय मागणी करण्यात आलेली आहे. त्याला अनुसरून पीएमपीएमएलच्‍या अध्यक्षांनी विषयांकीत फेरबदल करण्यासाठी महामंडळाचे अभिप्राय मागविलेले आहेत. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्‍या मागील बाजूची जागा माता रमाई आंबेडकर स्मारकासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने देण्यास हरकत नसल्‍याचे पीएमपीएमएलने कळविले आहे. त्‍यानुसार आरक्षण बदलास मान्‍यता देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com