‘चिमणी’बाबत कथा, कविता, चित्रकला स्पर्धा

‘चिमणी’बाबत कथा, कविता, चित्रकला स्पर्धा

Published on

पिंपरी, ता. २५ ः पक्षी व निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्ट आणि पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क यांच्यातर्फे जागतिक चिमणी दिनानिमित्त ‘चला चिऊ वाचवू अभियान २०२५’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत स्पर्धेत सहभागी होता येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष उमेश वाघेला यांनी दिली.
कथा आणि कविता मराठी, गुजराती, हिंदी किंवा इंग्रजी यांपैकी कोणत्याही भाषेत गुगल किंवा युनिकोड फॉंटमध्ये टाईप केलेली वर्ड फाईल असावी. पीडीएफ फाईल चालणार नाही. सर्वरचना स्वरचित असावी, तसेच ती कोठेही कोणत्याही स्वरूपात प्रकाशित झालेली नसावी. कोठूनही नक्कल केलेली अथवा एआयद्वारे तयार केलेली आढळल्यास स्पर्धेत ग्राह्य धरली जाणार नाही. आपली रचना https://tinyurl.com/AlivePune या लिंकवर २८ फेब्रुवारीपर्यंत अपलोड करावी.

अशा आहेत स्पर्धा
- चित्रकला स्पर्धा ः सर्व वयोगटांसाठी खुली आहे. स्पर्धकांनी ए-३ आकारातील कागदावर पेन्सिल किंवा कोणत्याही प्रकारच्या रंग माध्यमात काढलेले एक चित्र पाठवावे.
- कथा स्पर्धा ः चिमणीबद्दल काल्पनिक किंवा स्वानुभवावर आधारित स्वरचित एक कथा पाचशे ते एक हजार शब्दांपर्यंत पाठवावी. मराठी, हिंदी, गुजराती किंवा इंग्रजी यांपैकी कोणत्याही भाषेत रचना पाठवू शकता. १० ते १५ वर्षे, १६ ते ५९ वर्षे आणि ६० वर्षांपेक्षा अधिक अशी तीन गटांत स्पर्धा आहे.
- कविता स्पर्धा ः चिमणी विषयावर मराठी, हिंदी, गुजराती किंवा इंग्रजी यांपैकी कोणत्याही भाषेत एक स्वरचित कविता पाठवता येईल. शब्दमर्यादा नाही. १४ ते १८ वर्षे, १९ ते ५९ वर्षे, ६० वर्षांपुढील अशा तीन गटांत स्पर्धा आहे.
- प्रश्‍न मंजूषा स्पर्धा ः सातवी ते नववीतील विद्यार्थी सहभागी होऊ शकता. स्पर्धा प्राथमिक फेरी व अंतिम फेरी स्वरूपाची असेल. प्रश्‍नमंजूषा भारतात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांवर आधारित आहे. स्पर्धेचे ठिकाण व वेळ व्हाट्सॲपद्वारे कळवले जाईल. पक्षी प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत भाग घेण्यासाठी https://tinyurl.com/AliveBirdQuiz या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

सर्व स्पर्धांना विनामूल्य प्रवेश
कोणत्याही स्पर्धेत प्रवेश शुल्क नाही. वयोगटानुसार सर्व स्पर्धेत भाग घेऊ शकता. सर्वाधिक सहभाग नोंदवणाऱ्या शाळांना विशेष पारितोषिक देण्यात येईल. पारितोषिक वितरण सोहळा रविवारी (ता. १६ मार्च) होईल. स्पर्धा निकाल अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे फेसबुक पेज तसेच व्हॉट्सॲप चॅनलवर घोषित करण्यात येईल. चॅनल जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन फॉलो करावे. https://shorturl.at/oCjrT संपर्क ः ९८८११०१५४१ किंवा ९९२२५०७३३०.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com