

पिंपरी, ता. २५ : श्री महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. यावर्षी बुधवारी (ता. २६) हा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त शहर-उपनगरांतील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये भजन, कीर्तन, व्याख्यानांसह मुले व महिलांसाठी विविध स्पर्धांचा समावेश आहे. मंदिरांच्या गाभाऱ्यांसह परिसर फुलांनी सजवले असून रोषणाई केली आहे. यातील काही मंदिरे पौराणिक, ऐतिहासिक असून प्रत्येकाच्या आख्यायिका व इतिहास वेगवेगळा आहे.
चऱ्होलीचे वाघेश्वर मंदिर
चऱ्होलीतील टेकडीवर वाघेश्वर मंदिर आहे. गर्भगृह, गूढ मंडप आणि नंदी मंडप अशी मंदिराची रचना आहे. शिलालेखावरून मंदिराचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व अधोरेखित होते. ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांच्या यादीत मंदिराचा समावेश झालेला आहे.
मोशीतील नागेश्वर मंदिर
मोशीचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज मंदिर समतीतर्फे महशिवरात्रीनिमित्त महोत्सवाचे आयोजन केले आहे. नागेश्वर महाराज यांची समाधी आणि तपोभूमी म्हणून मोशीचे महत्त्व आहे. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणजे मंदिर आहे.
चिंचवडचे धनेश्वर मंदिर
पवना नदीकाठावर चिंचवडगावात प्राचीन शिवालय श्रीधनेश्वर मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात केले आहे. मंदिर
परिसर निसर्ग संपन्न आहे. येथे गोशाळाही आहे.
पिंपळे सौदागरचे महादेव मंदिर
पवना नदीकाठी पिंपळे सौदागर येथे महादेवाचे पुरातन मंदिर आहे. त्याच्या सुरक्षेसाठीमहापालिकेने सीमाभिंत बांधली आहे. प्रशस्त सभामंडप आहे. महाशिवरात्रीनिमित्त मोठा उत्सव असतो. सीमाभिंतीवर १२ ज्योतीर्लिंगशिल्प बसविले आहेत.
महादेवाची अन्य मंदिरे
जुनी सांगवीत मुळा-पवना नदी संगमावर संगमेश्वर मंदिर, सांगवी गावठाणात महादेव मंदिर; पुणे-मुंबई महामार्गालगत कासारवाडीतील शंकर मंदिर, पवना नदीकाठचे महादेव मंदिर; पवना नदीकाठी पिंपळे गुरव येथे महाकालेश्वर मंदिर; भोसरी गावठाणात महादेव मंदिर.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.