भोसरी येथून बांगलादेशी घुसखोराला अटक

भोसरी येथून बांगलादेशी घुसखोराला अटक

Published on

पिंपरी, ता. २५ : तीन वेगवेगळ्या नावांनी वास्तव्य करणाऱ्या आणखी एका बांगलादेशी घुसखोराला भोसरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई भोसरी-आळंदी रस्त्यावर बनाचा ओढ्याजवळ करण्यात आली.
नयन रतन सरकार (वय २१, रा. क्रिष्णापूर, लोहागारा, जि. नराईल, बांगलादेश, सध्या रा. लेबर कॅम्प, दिघी) असे या घुसखोराचे नाव
आहे. त्याच्याकडे राकेश रतन सरकार (रा. घोला नादिया, पश्चिम बंगाल) या नावाचे आधारकार्ड, तर सुमीत शंकर भक्ता (रा. नाकाशी पारा, पश्चिम बंगाल) नावाचे मतदान कार्ड आढळले आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘आरोपीचे मूळ नाव नयन सरकार आहे. त्याच्याकडील शाळेचा दाखल, आधारकार्ड, मतदान कार्ड या कागदपत्रांवर त्याचाच फोटो असून नावे मात्र वेगळी आहेत.’’
दरम्यान, बनाचा ओढा येथे नाकाबंदीवेळी एक दुचाकीस्वार संशयितपणे जाताना पोलिसांना दिसला. चौकशीवेळी त्याच्या हालचाली आणि बोलणे संशयास्पद जाणवले. त्याच्या पिशवीत वेगवेगळ्या नावांची कागदपत्रे आढळली. त्यातून तो बांगलादेशी असल्याचे समोर आले. नयन हा वर्षभरापासून शहरात राहत असून बांधकाम मजुरी करायचा, असे पोलिसांनी सांगितले. त्याला न्यायालयाने २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com