

वाळक्या झाडाने अपघाताचा धोका
रावेत, प्राधिकरण पेठ क्र. ३२ ए, ऐश्वर्यम मेलडी हाऊसिंग सोसायटीच्या शेजारी पदपथावरील गुलमोहोराचे झाड वाळून गेले आहे. ते केव्हाही पडून अपघात होण्याची शक्यता आहे. तरी झाड काढून टाकण्यात यावे.
- अर्जुन बन्ने, रावेत, प्राधिकरण
प्रशासनाचा ढिसाळ कारभार
स्वामी विवेकानंद भुयारी मार्ग आणि चिखली येथील घरकुल रस्ता खूप खराब आहे. प्रशासनाकडे तक्रारी दाखल करूनही काही सुधारणा होत नाहीत. हा प्रशासनाचा ढिसाळ कारभारच म्हणावा लागेल. जेव्हा नागरिकांचे जीवन आणि सुरक्षितता प्रभावित होते. तेव्हा, तातडीने आणि प्रभावीपणे उपाय योजले गेले पाहिजेत.
- आशिष अलोणी, नेवाळे वस्ती, चिखली
लटकलेल्या केबल्स धोकादायक
पिंपळे सौदागरकडून नाशिक फाट्याकडे जाताना सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथील सेवा रस्त्यावर केबल झाडाखाली लटकत होती आणि ती जाताना प्रत्येकाच्या मानेला, डोळ्याला लागत होती. मला पण मानेला लागली. मी त्वरित शेजारी बांधकाम चालू होते. तेथून नारळाची दोरी घेतली आणि झाडाच्या बुंध्याला बांधून दिली, अशा केबल तुटलेल्या लटकताना वारंवार दिसतात. तरी प्रशासनाने याची वेळीच काळजी घेतली; तर दुर्घटना होणार नाही.
- नाना देसले, पिंपळे गुरव
रस्त्याचे काम लवकर करा
चिंचवडगाव बस स्थानकावर पावसाळ्यात दरवर्षी पाणी साचण्याची समस्या होती. त्या समस्याचे निवारण करण्यासाठी तेथील ब्लॉक काढून बहुधा नवीन रस्ता करायचा काम हाती घेतले गेले आहे. तिथे खडी टाकण्यात आली आहे. परंतु काम वेळेवर पूर्ण होत नसल्यामुळे पावसात तिथे पाणी साचून चिखल होत आहे. तसेच डबक्याचे स्वरूप रस्त्याला आल्याचे दिसत आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अवघड होत असून दोन चाकी वाहने घसरण्याची दाट शक्यता आहे. लवकरात लवकर तेथील काम करणे अपेक्षित आहे.
- एस. एस. फाटक, चिंचवडगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.