

विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण
शि. प्र. मंडळीच्या मराठी व इंग्रजी माध्यम, निगडी शाळेत प्रवेशोत्सव दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, नगर कार्यवाह अशोक वाळके पाटील, शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी उपस्थित होते. मराठी माध्यमातील इयत्ता १ली ते १० वीच्या प्रत्येक वर्गाला औषधी वनस्पतींचे एकेक रोप देऊन विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी वैज्ञानिक बनून आले होते व त्यांनी वैज्ञानिकांची माहिती सांगितली. मुख्याध्यापिका सविता बिराजदार (मराठी माध्यम), मुख्याध्यापिका पल्लवी शानभाग (इंग्रजी माध्यम) यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थिनींचे औंक्षण
देहूतील संत जिजाबाई कन्या विद्यालय येथे इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये यावर्षी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींचे औक्षण करून आत्मीयतेने स्वागत करण्यात आले. यंदा पाचवी ते दहावीपर्यंत एकूण २८० नव्या विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर, पर्यवेक्षिका मनीषा निकम, इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी विद्यार्थिनींचे औंक्षण करून त्यांचे स्वागत केले.
पाठ्यपुस्तकांचे वाटप
देहू : आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन आणि फुलांच्या वर्षावाद्वारे स्वागत करण्यात आले. शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक संदीप जाधव, मुख्याध्यापक भानुदास मालुसरे, उपमुख्याध्यापिका सुरेखा पठारे, विद्या मोरे, अशोक आवारी व इतर शिक्षक उपस्थित होते. यावेळी शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. विद्या कदम यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.